adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गणेश विसर्जनानंतर गिरगांव चौपाटीवर स्वयंसेवकांद्वारे स्वच्छता मोहीम संपन्न ४०० हून अधिक स्वयंसेवकांनी नोंदविला उत्स्फूर्तपणे सहभाग

  गणेश विसर्जनानंतर गिरगांव चौपाटीवर स्वयंसेवकांद्वारे स्वच्छता मोहीम संपन्न  ४०० हून अधिक स्वयंसेवकांनी नोंदविला उत्स्फूर्तपणे सहभाग विशेष ...

 गणेश विसर्जनानंतर गिरगांव चौपाटीवर

स्वयंसेवकांद्वारे स्वच्छता मोहीम संपन्न

 ४०० हून अधिक स्वयंसेवकांनी नोंदविला उत्स्फूर्तपणे सहभाग


विशेष प्रतिनिधी / कमलेश शेवाळे 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


मुंबई - गणेशोत्सवाच्या सांगतेनंतर मुंबई येथील गिरगांव चौपाटी किनारा स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने रविवार २७ सप्टेंबर २०२६ रोजी एका भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. 'ग्रुप डायनॅमिक वेल्फेअर असोसिएशन, मुंबई' तर्फे आयोजित या उपक्रमाचे हे सलग ५ वे वर्ष असून या मोहिमेत तब्बल ४०० हून अधिक स्वयंसेवकांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या या उद्देशात अनेक तरुण, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन मोलाचे योगदान दिले. यामध्ये मराठी प्रबोधन, क. जे. सोमैया कला व वाणिज्य, क. जे. सोमैया विज्ञान व वाणिज्य आणि भारती विद्यापीठ (नवी मुंबई) च्या एन.एस.एस. (NSS) युनिटसह आश्रया फाउंडेशन, सेंच्युरी क्लासेस, ज्ञानमंदिर क्लासेस, ध्येय क्लासेस आणि साई विद्या क्लासेसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच, यावर्षी 'वक्रतुंड ढोल ताशा पथक (डोंबिवली)' आणि 'दुर्ग भ्रमण' ट्रेकिंग ग्रुपने देखील यात नव्याने सहभाग घेऊन योगदान दिले.


रविवारच्या सकाळी सर्व स्वयंसेवकांनी मिळून गिरगांव चौपाटीवरील मोठ्या प्रमाणातील कचरा गोळा करून समुद्रकिनारा स्वच्छ केला. यामुळे सागरी जीवसृष्टीचे रक्षण होण्यास आणि चौपाटीचे सौंदर्य पूर्ववत राखण्यास मोठी मदत झाली.

​

या यशस्वी उपक्रमाबद्दल आयोजकांनी सहभागी सर्व संस्था, विद्यार्थी व स्वयंसेवकांचे मनापासून आभार मानले.


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

श्रीरामपूर - 9561174111

No comments