मुक्ताईनगर शहर व तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न अंतुर्ली प्रतिनिधी किरण धायले (संपादक : हेमकांत गायकवाड) आढावा बैठकीमध्ये नु...
मुक्ताईनगर शहर व तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न
अंतुर्ली प्रतिनिधी किरण धायले
(संपादक : हेमकांत गायकवाड)
आढावा बैठकीमध्ये नुकतीच नियुक्ती झालेले नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष माननीय श्री संजय मुरलीधर पाटील यांनी मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीचा पदभार स्वीकारला सदर बैठकीमध्ये मुक्ताईनगर तालुक्यात काँग्रेस कशी घराघरापर्यंत पोहोचेल यावर विचार विनिमय करण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्यात दुष्काळ पडल्यामुळे महाराष्ट्र सरकारने सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना व शेतमजुरांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी यावर चर्चा करण्यात आली. तसेच बैठकीनंतर माननीय तहसीलदार सो मुक्ताईनगर यांना निवेदन देण्यात आले.
मुक्ताईनगर तालुक्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये यावर्षी पावसाचे असमान व अपुरे प्रमाण, पावसातील मोठे खंड, पिकांची झालेली नासाडी तसेच उत्पादनात झालेली घट यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या रोजगारावरही याचा गंभीर परिणाम झाला असून त्यांच्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्याची परिस्थिती लक्षात घेता, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी प्रत्येक गावात पंचनामे, विविध अटी व शर्ती आणि कागदोपत्री प्रक्रियेमुळे विलंब होऊ नये. संकटाची तीव्रता लक्षात घेऊन शासनाने महाराष्ट्र राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करून कोणत्याही अटी-शर्ती अथवा पंचनाम्याच्या प्रक्रियेविना सरसकट शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत तात्काळ जाहीर करावी.
त्याचप्रमाणे शेतीच्या कामांवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांचा रोजगार मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्याने त्यांनाही शासनाकडून थेट आर्थिक मदत देणे आवश्यक आहे.
म्हणून आमच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
1. महाराष्ट्र राज्यात सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन सरसकट दुष्काळ जाहीर करावा.
2. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्ती व पंचनामे न करता सरसकट हेक्टरी ₹75,000/- आर्थिक मदत जाहीर करून ती तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.
3. दुष्काळामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेल्या शेतमजुरांना प्रत्येकी ₹10,000/- आर्थिक मदत जाहीर करून तातडीने वितरित करावी.
4. पिकांचे नुकसान, उत्पादनातील घट आणि वाढलेला शेतीचा खर्च लक्षात घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक त्या इतर शासकीय सवलती व मदतीचा लाभ तातडीने द्यावा.
5. दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा व पाणी तसेच रोजगाराच्या उपलब्धतेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात.
6. वरील मागण्यांबाबतचे निवेदन शासनाच्या संबंधित विभागाकडे तातडीने पाठवून आवश्यक ती कार्यवाही करण्याची शिफारस करावी.
शेतकरी व शेतमजूर हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. सध्याच्या संकटाच्या काळात त्यांना कागदोपत्री प्रक्रियेत अडकविण्याऐवजी तातडीने प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक व तातडीने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, असे निवेदन मुक्ताईनगर तहसीलदार यांना देण्यात आले त्याप्रसंगी तालुकाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा सचिव दिनेश पाटील, प्रदेश सदस्य डॉ.जगदीश पाटील, ज्येष्ठ नेते एस.ए.भोई सर, गुलाबराव पाटील महाराज, बि.डी.गवई साहेब, शरदजी महाजन,भाऊराव महाजन,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस VJNT विभागाचे प्रदेश सचिव अनिल वाडीले, अंतुर्ली शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष शे. भैय्याजी, गजाननभाऊ पाटील, बाळूभाऊ कांडेलकर, जाफर काका, लखन पाटील, नामदेवराव भोई,सतीश पाटील,संजयभाऊ चौधरी, सतीश पाटील,ज्ञानेश्वर भाऊ इंगळे, राजेंद्र जाधव, चेतन झनके,यासीन खान काका, नाना नेरकर,व जेष्ठ, युवा, कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments