adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पारोळा श्रीबालाजी महाराज ब्रह्मोत्सवाचा पालखी सोहळ्याने होणार समारोप शुक्रवारी ३० ऑक्टोबरला काढा व महाप्रसादाचे आयोजन

पारोळा श्रीबालाजी महाराज ब्रह्मोत्सवाचा पालखी सोहळ्याने होणार समारोप शुक्रवारी ३० ऑक्टोबरला काढा व महाप्रसादाचे आयोजन  जळगाव जिल्हा प्रतिनिध...

पारोळा श्रीबालाजी महाराज ब्रह्मोत्सवाचा पालखी सोहळ्याने होणार समारोप

शुक्रवारी ३० ऑक्टोबरला काढा व महाप्रसादाचे आयोजन 



जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


पारोळा येथील श्री बालाजी संस्थानाच्या वती ने ११ ऑक्टोबरपासून सुरू असलेला ब्रह्मोत्सव 'श्रीं' चे तेरा वहनांसह रथोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. सोमवारी 'श्रीं' ची पालखी विविध प्रमुख मार्गावरून काढून रात्री उशिरापर्यंत या सोहळा समारोपाने ब्रह्मोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.पालखी मिरवणूक सकाळी ८ वा. "श्रीं"बालाजींच्या मंदिरापासून निघून रथ चौक, गांवहोळी चौक, गुजराथी गल्ली, मोठा महादेव चौक, मडक्या मारुती चौक कडून छोटे श्रीराम मंदीर (जुलूमपूरा) येथे आरती होऊन साईबाबा मंदीर कडून गोंधळ वाडा, मडक्या मारोती गल्लीने उत्तरेस आझाद चौक, झपाटभवानी मंदिरात देवी पद्मावतींची आरती होऊन पुन्हा आझाद चौकात येऊन पश्चिमेस लोहार गल्ली, हत्ती,गल्ली, बहिरम गल्ली, मराठे गल्लीतून पुन्हा परत, बहिरम गल्ली, कासार गल्लीने दुपारी मोठे श्री राम मंदिरात येईल. येथे जलस्नान, महाअभिषेक आरती, पूजन करून तेथून रात्री. ९ वा. निघून कासार गल्ली, बहिरम गल्ली, जडे गल्ली, क्रांती चौक, गुजराथी गल्ली, गांवहोळी चौकातून रथ चौक श्री बालाजी मंदिरात रात्री १ वाजेपर्यंत येईल.

दरम्यान 'श्रीं' च्या काढा व महाप्रसाद दि. ३० ऑक्टोबर शुक्रवारी दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बालाजी मंदिर चे अध्यक्ष व विश्वत मंडळ यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

No comments