adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वाघळीच्या यशवंत पब्लिक स्कूलच्या तिघांची राष्ट्रीय ग्रॅपलिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी, दोघांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एन्ट्री तर तिसरा रौप्य पदकाचा मानकरी

वाघळीच्या यशवंत पब्लिक स्कूलच्या तिघांची राष्ट्रीय ग्रॅपलिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी, दोघांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एन्ट्री तर तिसरा रौप्य ...

वाघळीच्या यशवंत पब्लिक स्कूलच्या तिघांची राष्ट्रीय ग्रॅपलिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी,

दोघांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एन्ट्री तर तिसरा रौप्य पदकाचा मानकरी 




विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी)

(संपादक : हेमकांत गायकवाड)


वाघळी(ता चाळीसगाव) येथील यशवंत पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हरिद्वार(उत्तराखंड) येथे झालेल्या 19 व्या राष्ट्रीय ग्रॅपलिंग(मल्लयुद्ध) चॅम्पियनशिप स्पर्धेत चमकदार कामगिरी केली असून शाळेतील दोघे राष्ट्रीय पातळीवर पहिले आले असून त्यांची नेपाळमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर तिसरा विद्यार्थी रौप्य पदकाचा मानकरी ठरला आहे.

 15 वयोगटावरील 73 किलो वजन गटातील स्पर्धेत शाळेतील सोहम विलास माळी राष्ट्रीय लेव्हलवर पहिला आला असून पंधरा वर्षावरील 32 किलो वजन गटात शाळेतील दिशांत संदीप पाटील हा राष्ट्रीय पातळीवर पहिला आल्याने दोघांची आगामी काळात नेपाळमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ग्रॅपलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तर शाळेतीलच पवन सदानंद पाटील हा विद्यार्थी रौप्य पदकाचा मानकरी ठरला आहे.विशेष म्हणजे या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदाच प्रथम येण्याची कामगिरी खेडूत विद्यार्थ्यांनी करून दाखवली आहे. 

  या स्पर्धेत देशातील 22 राज्यांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. राष्ट्रीय पातळीवर कामगिरी करणाऱ्या तीनही विद्यार्थ्यांचे वाघळीसह चाळीसगाव तालुक्यात कौतुक होत असून त्यांना शाळेतील क्रीडा शिक्षक बबलू चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या चमकदार कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष परमानंद सूर्यवंशी,प्राचार्या जयश्री सूर्यवंशी व शिक्षकांसह पालकांनी कौतुक केले आहे...... हरिद्वार (उत्तराखंड) राष्ट्रीय पातळीवर प्रथम आल्याने स्पर्धकांना गोल्ड मेदल देऊन गौरवतांना आयोजक

No comments