दुष्काळात तेरावा महिना ! महागाईच्या झळांनी सामान्यांचे जगणे कठीण. धान्य, साखर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांचा सर्वसामान्यांना फटका;...
दुष्काळात तेरावा महिना !
महागाईच्या झळांनी सामान्यांचे जगणे कठीण.
धान्य, साखर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांचा सर्वसामान्यांना फटका; हाताला काम नाही, उत्पन्नाचे साधन नाही- कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा तरी कसा?
लातूर, जि.प्र. (उत्तम माने, 8484878818)
(संपादक : हेमकांत गायकवाड)
दुष्काळाचे संकट, शेतीतून
घटलेले उत्पन्न, हाताला काम मिळण्याची वानवा आणि दुसरीकडे दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, अशा दुहेरी संकटात सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. तांदूळ, गहू, ज्वारी, डाळी, खाद्यतेल, साखर यांसह दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडत आहें. आर्धाच दुष्काळामुळे उत्पन्नाचा मार्ग खुंटला असताना महागाईनेही डोके वर काढल्याने नागरिकांसाठी जगणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. त्यामुळे 'दुष्काळात तेरावा महिना' अशी परिस्थिती निर्माण झाल्याची भावना सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
शेतीचे उत्पन्न घटले, रोजगाराचा प्रश गंम्भीर.
ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह शेती, शेतमजूरी आणि रोजंदारीच्या कामावर अवलंबून असतो, मात्र, पावसाची अनिश्तिता, पिकांचे नुकसान आणि शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी व शेतमजूर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतात काम उपलब्ध नसल्याने रोजंदारीवर जगणान्या कुटुंबांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
दररोज काम केल्यावरच घरात चूल पेटणान्या कुटुंबांना काम मिळत नसेल, तर त्यांनी घरखर्च भागवायचा कसा? मुलांचे शिक्षण, औषधोपचार, वीजबिल, प्रवासखर्च आणि घरातील इतर आवश्यक गरजा पूर्ण करायच्या कशा? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांसमोर उभे ठाकले आहेत.
जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने घरखर्चाचे बजेट कोलमडले.
तांदूळ, गहू, ज्वारी, डाळी, साखर, खाद्यतेल आणि इतर किराणा वस्तूंच्या किमतेंमुळे महिन्याचा घरखर्च भागवणे अनेक कुटुंबांसाठी आव्हानातक बनले आहे. उत्पन्न मर्यादित असताना खचर्चात वाढ होत अशल्याने नागरिकांना गरजा कमी कराव्या लागत आहेत. काही कुटुंबांना पौष्टिक आहारावर मर्यादा आणावी लागत असून, मुलांच्या गरजा आणि घरातील ज्येष्ठांच्या औषधोपचारांबाबतही तडजोड करण्याची वेळ येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. महागाईचा सर्वाधिक फटका अल्प उत्पन्न गटातील कुटुंबे, कुटुंबे, शेतमजूर, शेतमजूर, रोजंदारी कामगार आणि आर्थिकदृष्ध्या दुर्बल घटकांना बसत आहे.
सरकारी मदत आणि रोजगाराच्या उपाययोजनांकडे नागरिकांचे लक्ष.
दुष्काळी परिस्थितीत केवळ आर्थिक मदत जाहीर करणे पुरेसे नसून, गरजू नागरिकांपर्यंत मदर्तचा प्रत्यक्ष लाभ पोहोचणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, रोजगार हमीच्या कामांना गती देणे, पात्र लाभाथ्यांना रेशनवरील धान्य वेळेवर उपलब्ध करून देणे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतेंवर नियमानुसार नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून पात्र कुटुंबांना धान्य नियमित मिळते का, बाजारात अनियमिता किंवा साठेबाजी होत आहे का, याची संबंधित यंत्रणांनी तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
जगायचे कसे?' हा सामान्यांसमोरील प्रश्न.
दुष्काळामुळे काम नाही, काम नसल्याने उत्पन्न नाही आणि उत्प नसताना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सामान्य माणसाने कुटुंबाचा उदरानांत करायचा तरी कसा, हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. एका बाजूला रिकामे खिसे आणि दुसन्या बाजूला वाढता घरखर्च, यामुळे अनेक कुटुंबांवर मानसिक व आर्थिक ताण वाढत आहे. दुष्काळ ही केवळ शेतीची समस्या नाही, तर ती ग्रामीण अर्थव्यवस्थेपासून सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरापर्यंत समस्या आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, ही अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागरिकांना केवळ आश्वासनांपेक्षा
प्रत्यक्ष दिलासा हवा !
दुष्काळ आणि महागाईच्या दुहेरी संकटातून सामान्य माणसाला बाहेर काढण्यासाठी शासन व प्रशासनाने ठोस पावले उचलावीत,
अशी अपेक्षा व्यक होत आहे.



No comments