अंतुर्ली येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने चुनरी यात्रा संपन्न प्रतिनिधी किरण धायले (संपादक : हेमकांत गायकवाड) नवरात्राचे दिवस च...
अंतुर्ली येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने चुनरी यात्रा संपन्न
प्रतिनिधी किरण धायले
(संपादक : हेमकांत गायकवाड)
नवरात्राचे दिवस चालू आहे नवरात्राचे औचित्य साधत मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने अंतुर्ली ते इच्छापुर(मध्येप्रदेश )चुनरी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते .हे चुनरी यात्रेचे 6 वे वर्ष आहे.हि चुनरी यात्रा बजरंग चौकात असलेल्या बजरंग बलीच्या मंदिरापासून काढण्यात आली प्रथम आरती करून कन्या पूजन करण्यात आले नंतर चुनरी यात्रेला सुरुवात करण्यात आली .या चुनरी यात्रेचे प्रमुख आकर्षक एकदंत साऊंड व हनुमानाची मूर्ती हे होते .ही चुनरी यात्रा दुट्टे वाडा,छत्रपती शिवाजी महाराज चौक, व गावात फिरून इच्छापूर कडे रवाना झाली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चुनरी यात्रा उत्साहात संपन्न झाली या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक ,भाविक भक्त,विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते .अशा प्रकारे मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे चुनरी यात्रा संपन्न झाली .या चुनरी यात्रेची समाप्ती इच्छादेवीला चुनरी चढवून करण्यात आली.

No comments