चिनावल गावात 27 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू डोक्यावर गावठी कट्ट्याद्वारे गोळी झाडली असल्याचा संशय! पोलीस तपास सुरू मुबारक तडवी रा...
चिनावल गावात 27 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू
डोक्यावर गावठी कट्ट्याद्वारे गोळी झाडली असल्याचा संशय! पोलीस तपास सुरू
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथून जवळच असलेल्या चिनावल गावात एका २७ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडल्याने चिनावलगावात खळबळ उडाली आहे निर्मल युवराज महाजन वय 27 वर्षे असे मयत तरुणाचे नाव आहे मयत तरुणाने डोक्यात गोळी झाडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी गावठी कट्टा व पाच रिकामे (वापर केलेले)व दोन जिवंत काडतुसे सापडली असून ती जप्त करण्यात आले आहेत रावेर तालुक्यातील सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिनावल येथील २७ वर्षीय तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मल महाजन याच्या चेहऱ्यावर उजव्या डोळ्याजवळ गोलाकार सुमारे ६ मिमी आकाराचे छिद्र पडलेल्या अवस्थेत आढळून आले नातेवाईकांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, सावदा येथे घेऊन आले.मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्याचा त्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.
या घटनेची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन पाटील यांनी सावदा पोलिसांना लेखी मेमोद्वारे दिली. त्यावरून सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (अमृ क्र. २२/२०२६) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे.घडलेल्या घटनेचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही तरी घटना नेमकी कशी घडली आहे, डोळ्यामागील चेहऱ्यावर झालेली ६मिमी ची जखमेचे छिद्र कशामुळे झाले याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या आदेशानुसार घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत.जर मृत्यू स्वताला गोळी झाडून झाला तर मयत तरुणा जवळ गावठी कट्टा कोठून व कसा आला?चिनावल गावापर्यंत गावठी कट्टा पोहचला कसा हे पोलीस तपासात निष्पन्न होणार असले तरी सदरच्या तरुणाने आत्महत्या का केली? असे एक ना अनेक प्रश्न समोर येतात मात्र घटनेची सत्यता तपासाअंती उलगडणार आहे.

No comments