लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुक काँग्रेसचे विश्वनाथ बिराजदार यांची उमेदवारी मागे; जिल्हा बँकेवर शोभा अभिमन्यू पवार बिनविरोध लातू...
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुक काँग्रेसचे विश्वनाथ बिराजदार यांची उमेदवारी मागे; जिल्हा बँकेवर शोभा अभिमन्यू पवार बिनविरोध लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी औसा तालुका मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ शामराव बिराजदार.
लातूर, जि. प्र. (उत्तम माने, 8484878818)
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
लातूर:- लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी औसा तालुका मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ शामराव बिराजदार यांच्यासह इतर दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने अखेर या मतदारसंघातील उमेदवार सौ. शोभा अभिमन्यू पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. या मतदारसंघातील उमेदवारी मागे घेत काँग्रेसने भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याबरोबर हात मिळवणी केल्याचे स्पष्ट होत आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने आपले पॅनल उभे केले. विशेषतः औसा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी सौ. शोभा अभिमन्यू पवार यांनी उमेदवारी दाखल केली होती. याच मतदारसंघात काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि आलमला येथील सोसायटीचे चेअरमन विश्वनाथ शामराव बिराजदार यांनीही वरिष्ठांच्या आदेशानुसार उमेदवारी दाखल केली होती. तसेच टाका येथील गोरख दासा सावंत आणि मंगरूळ येथील युवराज शाहूराज बिराजदार यांचेही उमेदवारी अर्ज या मतदारसंघातून होते. मात्र युवराज बिराजदार, गोरख सावंत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या मतदारसंघात शोभा अभिमन्यू पवार व विश्वनाथ शामराव बिराजदार यांच्यात लढत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र बुधवारी विश्वनाथ बिराजदार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
या मतदारसंघात उमेदवार असलेल्या चार पैकी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने अखेर सौ. शोभा अभिमन्यू पवार यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र या निवडीची अधिकृत घोषणा चार नोव्हेंबर रोजी निवडणूक अधिकाऱ्याकडून होईल, हे स्पष्ट झाल्या आहे.
शोभा अभिमन्यू पवार यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज राहिल्याने पवार नेमक्या कोणत्या पॅनलच्या उमेदवार आहेत, याची स्पष्टता अद्याप झाली नाही. बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी कदाचित काँग्रेसने भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी केलेली ही हात मिळवणी, महायुतीतील इतर नेत्यांच्या व उमेदवारांच्या पचनी पडेल का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

No comments