नगराध्यक्षा लिलाताई चौधरी व नगरसेविका ज्योती पाटील यांना "समाजभूषण पुरस्कार..." विकास पाटील धरणगाव - (संपादक : हेमकांत गायकवाड) ...
नगराध्यक्षा लिलाताई चौधरी व नगरसेविका ज्योती पाटील यांना "समाजभूषण पुरस्कार..."
विकास पाटील धरणगाव -
(संपादक : हेमकांत गायकवाड)
धरणगाव -- शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा लिलाताई सुरेश चौधरी व प्रभाग क्र. ०८ च्या नगरसेविका ज्योती लक्ष्मण पाटील यांना राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया या संस्थेमार्फत जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात "समाजभूषण पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, समाज भूषण, कृषिरत्न, कृषी गौरव पुरस्कार सोहळा २०२६ आज उत्साहात संपन्न झाला. भारताचे दुसरे राष्ट्रपती - तत्त्वज्ञ - भारतरत्न तसेच महान शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या १३८ व्या जयंतीचे औचित्य साधून आज दि. ०४/१०/२०२६ वार - रविवार रोजी राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया या संस्थेमार्फत आयोजित पोलीस मल्टीपर्पज हॉल जळगाव येथील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सामाजिक क्षेत्र, गरिबी अत्याचार, शोषण, मानवाधिकार हनन आणि पर्यावरण संबंधित ज्वलंत समस्यांवर करडी नजर ठेवण्या हेतू सरकार आणि सामाजिक संस्थेमार्फत पीडित व्यक्तींना न्याय व मदत करण्यासाठी कार्य करणारे आदर्श शिक्षक, समाजभूषण, कृषीरत्न, कृषीगौरव यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
यामध्ये समाजातून असे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर, सीनियर शिक्षक - प्राध्यापक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये धरणगाव शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा लिलाताई सुरेश चौधरी व प्रभाग क्र. ०८ च्या नगरसेविका ज्योती लक्ष्मण पाटील यांना आज जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात "समाजभूषण पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे फाउंडर आणि प्रेसिडेंट अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे प्रफुल्ल सीताराम पाटील (स्टेट प्रेसिडेंट महाराष्ट्र), प्रा. मंदाकिनी नवल भामरे (महिला प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र), प्रमोदिनी पाटील (महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष), ईश्वर पाटील (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष) गायत्री सी. पाटील (महाराष्ट्र राज्य महिला कार्याध्यक्ष), अर्चना गंभीरराव वाघ (जळगाव जिल्हा उपाध्यक्ष), भूपेंद्र पुरुषोत्तम बेंडाळे (जळगाव तालुकाध्यक्ष), आर. ए. पाटील (जळगाव जिल्हाध्यक्ष), योगिता रतिलाल पाटील (जळगाव शहर महिला अध्यक्ष), मंदिर हुटेकर (बुलढाणा जिल्हाध्यक्ष), रुपाली गायकवाड (बुलढाणा महिला जिल्हाधक्ष), सुनीता बाहेकर (बुलढाणा जिल्हा महिला कार्याध्यक्ष) यांच्यासह राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

No comments