फैजपूर शहरातील नवीन भागांमध्ये रस्ते व गटारींची कामे तातडीने सुरू करा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी इदू पिंजारी फैजपूर (संपादक - ...
फैजपूर शहरातील नवीन भागांमध्ये रस्ते व गटारींची कामे तातडीने सुरू करा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक - हेमकांत गायकवाड)
फैजपूर : शहरातील तहानगर परिसरातील नवीन भागांमध्ये अद्याप योग्य रस्ते व गटारींची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येची तातडीने दखल घेऊन संबंधित भागात नवीन रस्ते व गटारींची बांधकामे करण्यात यावीत, अशी मागणी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष शेख रज्जाक शेख इक्बाल यांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी, नगरपरिषद यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, तहानगरच्या नवीन भागांमध्ये रस्ते व गटारींची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः पावसाळ्यात पाणी साचणे, चिखल होणे तसेच सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित न होणे यामुळे नागरिकांच्या दैनंदिन ये-जा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनधारकांना याचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने तहानगरातील नवीन भागाची पाहणी करून पावसाचे पाणी व सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी गटारी तसेच नागरिकांच्या सोयीसाठी पक्के रस्ते तातडीने बांधून द्यावेत, अशी मागणी शेख रज्जाक शेख इक्बाल यांनी केली आहे. या मागणीची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षाही निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. निवेदन देतांना शहर अध्यक्ष रज्जाक शेख जुबेर काझी नदीम तडवी जफर अली दानिश मेंबर व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

No comments