adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निरपेक्ष चरण सेवा हीच सुखाची साधना असते ह भ प रितेश महाराज चौधरी

 निरपेक्ष चरण सेवा हीच सुखाची साधना असते  ह भ प रितेश महाराज चौधरी             इदू पिंजारी फैजपूर   [संपादक-हेमकांत  गायकवाड]          न्हा...

 निरपेक्ष चरण सेवा हीच सुखाची साधना असते  ह भ प रितेश महाराज चौधरी   


        

इदू पिंजारी फैजपूर

 [संपादक-हेमकांत  गायकवाड]       

न्हावी . प्रपंच असो का परमार्थ आपण कोणाकडे काहीही मागता कामा नये . पण मागायची इच्छा झाली असेल ते देवाकडेच मागावे  आणि प्रेमाशिवाय दुसरे काही मागू नये असे प्रतिपादन हभप रितेश महाराज चौधरी यांनी केले . न्हावी येथे आयोजित सालाबादप्रमाणे नाथ मंदिरातील भागवत सप्ताह प्रसंगी  टाटा एंटरप्राइजेस इंजीनियरिंग प्रमुख असलेले हभप रितेश महाराज चौधरी यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले होते . वारकरी सांप्रदायिक परंपरेच्या अनुसार सप्ताहाच्या सातव्या दिवशी "सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ति । रखुमाईच्या पती      सोयरीया ॥ या मागणी पर अभंगावर महाराजांनी विवेचन केले .संतांनी देवाकडेच मागणी मागितले आणि मागणीतून देव आणि देवाविषयी प्रेम या व्यतिरिक्त काहीही मागितल्याचे दिसत नाही .आपण बऱ्याचदा प्रपंचात स्वार्थापोटी लाचारी पत्करतो एका जीवाने दुसऱ्या जिवाकडे मागणं हे अत्यंत लाजिरवाणी बाब  आहे . म्हणून सर्वसामर्थ्यशाली असणाऱ्या पांडुरंगाकडे आपण लडीवाळपणे मागणी मागू शकतो . म्हणून संतांनी सुद्धा देवाकडेच मागणी मागितलेली आहे . संतांच्या अनेक अभंगातून आपल्याला हे आढळते . रितेश महाराज यांनी अभंगाचे विवेचन करत असताना परंपरेचे नियम समाजासाठी किती महत्त्वाचे आहे याचे प्रतिपादन केले .सध्याच्या काळात बुवाबाजीच्या नावाखाली सांप्रदाय बुडवणाऱ्या गोष्टी सर्रासपणे सुरू आहे . आणि याला आपल्यातील बरेच जण अनुमोदन देत असल्याची टीका त्यांनी याप्रसंगी केली . महाराष्ट्रातील १९३ वर्षाची परंपरा असलेल्या सद्गुरू झेंडू जी महाराज बेळीकर परंपरेलाच आपले अधिष्ठान म्हणून आपण परंपरेच्या मार्गदर्शनानुसारच परमार्थ करावा असे त्यांनी श्रोत्यांना आवाहन केले . भगवंताची निरपेक्ष चरण सेवा हीच खऱ्या सुखाचे कारण असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. कीर्तनाचे यजमानपद श्री पंढरीनाथ पाटील यांच्याकडे होते. गावातील भजनी मंडळाचे अनमोल सहकार्य लाभले .

No comments