adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात राजीव गांधी पंचायत राज संघटनेची नियोजन बैठक उत्साहात अविनाशजी उमरकर यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यानिमित्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात राजीव गांधी पंचायत राज संघटनेची नियोजन बैठक उत्साहात अविनाशजी उमरकर यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यानिमित्...

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात राजीव गांधी पंचायत राज संघटनेची नियोजन बैठक उत्साहात

अविनाशजी उमरकर यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यानिमित्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती


जळगाव / मुक्ताईनगर प्रतिनिधी – किरण धायले

[संपादक-हेमकांत  गायकवाड]       

महाराष्ट्र प्रदेश राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाशजी उमरकर यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यानिमित्त जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात राजीव गांधी पंचायत राज संघटनेची नियोजन बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीस राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र प्रभारी श्रीमती गीता कडवे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद स्तरावर संघटना अधिक सक्षम व मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

गावागावात काँग्रेसचा जनसंपर्क वाढविणे, पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करणे, कार्यकर्त्यांची सक्रिय फळी उभी करणे तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने संघटनात्मक नियोजन करण्याबाबत बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी मा. श्री. अविनाशजी उमरकर यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. संघटनात्मक बांधणी, स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचा सहभाग आणि पंचायत राज व्यवस्थेत संघटनेची भूमिका याबाबत त्यांनी आपले विचार मांडले. तसेच उत्तर महाराष्ट्र प्रभारी श्रीमती गीता कडवे यांनी राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या कार्याबाबत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.

बैठकीच्या प्रारंभी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.  या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव मा. श्री. हारून नदवी, प्रदेश सचिव मा. सौ. ऐश्वर्या ताई राठोड, जळगाव जिल्हा पश्चिम काँग्रेसचे अध्यक्ष श्री. अविनाश भालेराव, जळगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री. जमील शेख, माजी जिल्हाध्यक्ष मा. श्री. सलीम पटेल, माजी जिल्हाध्यक्ष श्री. उदय पाटील, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष मा. सौ. सुलोचना वाघ यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व संघटनेचे विविध स्तरावरील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान आगामी काळातील संघटनात्मक कार्यक्रम, पंचायत राज व्यवस्थेतील कार्यकर्त्यांची भूमिका आणि स्थानिक पातळीवर पक्षाचा जनसंपर्क वाढविण्याच्या दृष्टीने विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.

No comments