adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा वर्षावास पुष्प सतरावे तावसे येथे संपन्न

  चोपडा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा वर्षावास पुष्प सतरावे तावसे येथे संपन्न  चोपडा   प्रतिनिधी [संपादक- हेमकांत गायकवाड]     दी.बुद्धिस्...

 चोपडा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा वर्षावास पुष्प सतरावे तावसे येथे संपन्न 


चोपडा  प्रतिनिधी

[संपादक- हेमकांत गायकवाड] 

  दी.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा पूर्व अंतर्गत चोपडा तालुका यांच्या विद्यमाने राज्याच्या व जिल्ह्याच्या नियोजनानुसार आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षावास मालिका सुरू असून तावसे बुद्रुक ता.चोपडा येथील ज्ञानज्योती बुद्ध विहारात वर्षावास प्रवचन मालिका पुष्प सतरावे  गुफाण्यात आले.यावेळी आयु.अरुण भिमराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षावास कार्यक्रम संपन्न झाले.आधार अभिमन शिंदे व अरुण शिंदे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच त्रिशरण,पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.आजचा विषय बुद्ध धम्माचे खास वैशिष्ट्ये  या विषयावर प्रवचनकार आयु.रमेश गोबा सोनवणे (बौद्धाचार्य तथा कोषाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा) यांनी मालिकेतले पुष्प पूर्ण करून धम्मदेसना दिली. यावेळी आयु.भरत भिमराव शिरसाठ(शहराध्यक्ष )व आयु. शालिग्राम व्यंकट करंदीकर, महेंद्र प्रल्हाद म्हैसरे (बौद्धचार्य )यांनी मार्गदर्शन केले.

      सदर वर्षावास कार्यक्रमासाठी शालिग्राम व्यंकट करंदीकर (प्रमुख,समता सैनिक दल), जानकीराम शंकर सपकाळे,वसंत बाबुराव शिंदे प्रभाकर शिंदे,सुकदेव लक्ष्मण बाविस्कर,आधार अभिमान शिंदे,प्रवीण धनसिंग शिंदे ,शरद आधार शिंदे ,सुनील जुलाल शिंदे ,अरुण भिमराव शिंदे, कैलास जलाल शिंदे ,गोकुळ दगा शिंदे, सुभाष वसंत शिंदे ,शिवदास नामदेव शिंदे ,वसन विकास शिंदे ,शांताराम गंगाराम शिंदे ,बाळकृष्ण भास्कर शिंदे , विजयानंद शिंदे सागर रमेश शिंदे ,रमेश प्रल्हाद शिंदे ,सिद्धार्थ गोकुळ शिंदे ,हर्षल शरद शिंदे ,विशाल सुनील शिंदे , राजु शिंदे ,चेतन शिंदे ,आदी बौद्ध उपासक- उपासीका,भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक आयु. भरत भिमराव शिरसाठ सर यांनी केले. शेवटी आभार प्रविण धनसिंग शिंदे सर  यांनी मानले.

जयभीम! नमो बुद्धाय!!

No comments