दापका वेस ते अशोकनगर नालीचे काम निकृष्ट दर्जाचे. कामाची प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्ता तपासण्याची देविदास धैर्य यांची मागणी. लातूर, जि.प...
दापका वेस ते अशोकनगर नालीचे काम निकृष्ट दर्जाचे. कामाची प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्ता तपासण्याची देविदास धैर्य यांची मागणी.
लातूर, जि.प्र. (उत्तम माने )
[संपादक- हेमकांत गायकवाड]
निलंगा नगर परिषद हद्दीतील दापका वेस ते अशोकनगरदरम्यान रस्त्याच्या बाजूने सुरू असलेल्या नालीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप अशोकनगर येथील सामाजिक कार्यकर्ते देविदास गोरोबा धैर्य यांनी केला असून, नगर परिषद प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील पायाभूत सुविधांची कामे दर्जेदार आणि टिकाऊ होणे आवश्यक आहे. नालीच्या बांधकामात त्रुटी राहिल्यास पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे काम सुरू असतानाच त्याची गुणवत्ता तपासून आवश्यक त्या सुधारणा करणे गरजेचे आहे.
दापका वेस ते अशोकनगरदरम्यान सुरू असलेल्या नालीच्या कामाची प्रत्यक्ष स्थळपाहणी करावी, मंजूर अंदाजपत्रक व तांत्रिक निकषांनुसार बांधकाम होत आहे का, याची तपासणी करावी आणि निकृष्ट काम किंवा अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी धैर्य यांनी केली आहे नगर परिषद प्रशासनाने या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कामाचा दर्जा सुनिश्चित करावा आणि सार्वजनिक निधीतून होणारे बांधकाम गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करून घ्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे

No comments