मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूल तर्फे माजी खासदार, कृषीमित्र स्वर्गवासी हरिभाऊ जावळे यांच्या जयंती निमित्त शाळेला शालेय साहित्य वाटप यावल प्रति...
मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूल तर्फे माजी खासदार, कृषीमित्र स्वर्गवासी हरिभाऊ जावळे यांच्या जयंती निमित्त शाळेला शालेय साहित्य वाटप
यावल प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
यावल येथील मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूल तर्फे माजी खासदार, कृषीमित्र स्वर्गवासी हरिभाऊ जावळे यांच्या जयंती निमित् तारकेश्वर शाळेला शालेय साहित्य वाटप करून समाजप्रबोधनाचा आदर्श कार्यक्रम राबविला
माजी खासदार, कृषीमित्र स्वर्गवासी हरिभाऊ जावळे यांच्या जयंती निमित् तारकेश्वर शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
शाळेच्या संस्थाध्यक्ष माननीय नीताताई गजरे मॅडम यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचे उपक्रम हाती घेतला.विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. तसेच शिक्षणामुळे आपण यशाचे शिखर गाठु शकतो हे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
याप्रसंगी शाळेच्या संस्थाध्यक्ष माननीय नीताताई गजरे मॅडम, श्री धनराज कोळी सर, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments