जळगाव मनपा जिल्हास्तरीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा संपन्न जळगाव येथे १४ वर्षांखालील मुलींच्या गटातील विजेत्या आणि उपविजेत्या मुलींच्या संघांसो...
जळगाव मनपा जिल्हास्तरीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा संपन्न
जळगाव येथे १४ वर्षांखालील मुलींच्या गटातील विजेत्या आणि उपविजेत्या मुलींच्या संघांसोबत फारुख शेख, किशोर चौधरी, डॉ. अनिता कोल्हे आणि इतर
लियाकत शाह जळगांव
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जळगाव महानगरपालिका जिल्हास्तरीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली.
जीसीओई फुटबॉल मैदानावर आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन फुटबॉल असोसिएशनचे सचिव आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे (WIFA) सदस्य फारूक शेख यांच्या हस्ते शनिवारी झाले.
याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे मार्गदर्शक आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते किशोर चौधरी, फुटबॉल असोसिएशनचे संचालक आमिर शेख, भास्कर पाटील आणि प्राध्यापिका डॉ. अनिता कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्घाटनावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना फारूक शेख म्हणाले, "शालेय स्तरावरील अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये खिलाडीवृत्ती, सांघिक भावना आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते."
स्पर्धेचे निकाल
१९ वर्षांखालील (मुली)
अंतिम सामन्यात, स्वामी विवेकानंद कॉलेज ने जी. डी. बेंडाले संघाला ७-० ने हरवले.
१९ वर्षांखालील (मुले)
अंतिम सामन्यात इक्रा शाहीन ने स्वामी विवेकानंदला संघाला २-० ने हरवले.
१४ वर्षांखालील (मुली)
अंतिम सामन्यात पोद्दार स्कूलने विद्या इंग्लिश संघाला २-० ने हरवले.
१४ वर्षांखालील (मुले) गटाच्या अंतिम सामन्यात सेंट टेरेसा स्कूलने रोझलँडला संघाला १-० ने हरवले.
विशेष पाठिंबा आणि प्रतिसाद
आमिर शेख, साबिर शेख, खालिद शेख, वसीम, रियाझ, तौसीफ खान आणि वसीम चंद यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला आहे.

No comments