adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर नगरपालिकेत महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात; शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रतिमेचे पूजन

फैजपूर नगरपालिकेत महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात; शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रतिमेचे पूजन इदू पिंजारी फैजपूर  (संपादक : हेमकांत गायकवा...

फैजपूर नगरपालिकेत महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात; शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रतिमेचे पूजन


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ हा महान विचार देणारे आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांचे आदर्श चरित्र रामायणाच्या माध्यमातून कलमबद्ध करून सनातन वैदिक संस्कृतीचे रक्षण करणारे आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती फैजपूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. फैजपूर नगरपालिकेमध्ये शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

महर्षी वाल्मिकी यांनी आपल्या विचारांतून आणि रामायणाच्या माध्यमातून संपूर्ण मानवतेला धर्म, त्याग, कर्तव्य, सत्य, ज्ञान आणि संस्कारांचा अमूल्य संदेश दिला. त्यांच्या या महान विचारांचा आदर्श घेऊन समाजात एकता, समता आणि बंधुभाव जपण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला.

या कार्यक्रमाप्रसंगी शहराचे प्रथम नागरिक तथा भाजपचे नगराध्यक्ष पती पवनभाऊ सराफ आणि चंदूभाऊ कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिवसेना पदाधिकारी व माजी नगरसेवक मनोज भाऊ कापडे,माजी नगरसेवक अप्पासाहेब चौधरी, ऍड. आकाश चौधरी, नितीन भाऊ कोळी, कृणाल (पप्पूभाऊ) चौधरी, लोकेश भाऊ कोल्हे, विजय भाऊ मिस्तरी, मृणाल भाऊ नारखेडे, सनी भाऊ तेजकर, मोहित भाऊ जावळे, नगरसेवक आवेश (भांजा) नीरज भाऊ झोपे, भूषण भाऊ चौधरी, जलील भाऊ मोमीन आणि किरण भाऊ भिल यांच्यासह अनेक शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरपालिके सोबत शहरात विविध ठिकाणी देखील महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच स्तरांतून आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या पवित्र स्मृतींना कोटी कोटी प्रणाम करण्यात आले. यावेळी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments