adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पुस्तकाच्या माध्यमातून विचारांची समृद्धी घडावी न्हावी ता. यावल येथील जि प प्राथमिक शाळेत ललित फिरके यांनी केले मार्गदर्शन

 पुस्तकाच्या माध्यमातून विचारांची समृद्धी घडावी    न्हावी ता. यावल येथील जि प प्राथमिक शाळेत ललित फिरके यांनी केले मार्गदर्शन  इदू पिंजारी फ...

 पुस्तकाच्या माध्यमातून विचारांची समृद्धी घडावी 

  न्हावी ता. यावल येथील जि प प्राथमिक शाळेत ललित फिरके यांनी केले मार्गदर्शन 


इदू पिंजारी फैजपूर 

[ संपादक -  हेमकांत गायकवाड]      

न्हावीच्या ता. यावल येथील जि.प.प्राथमिक शाळेत वाचन प्रेरणा दिन  साजरा विद्यार्थ्यांनी केले बालवाङ्मयाचे वाचन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाची भूक वाढावी आणि पुस्तकांच्या माध्यमातून विचारांची समृद्धी घडावी, या उद्देशाने न्हावी येथील श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या वतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त प्राथमिक शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे सहसचिव ललित कुमार फिरके यांनी विद्यार्थ्यांना दररोज वाचन करून आपल्या ध्यानात भर टाकावी आणि वाचन ही काळाची गरज असल्याचे सांगितले.   कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला वाचनालयाचे अध्यक्ष हेमकांत गाजरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी वाचनालयाचे सचिव युवराज तळेले, सहसचिव ललित कुमार फिरके, संचालक मिलिंद बेंडाळे, ग्रंथपाल ललित इंगळे, भास्कर भोगे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रूपाली पाटील, सौ. शबाना तडवी, श्रीमती प्रज्ञा सोनवणे यांच्यासह शिक्षकवृंद आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

दररोज दोन पाने वाचा, ज्ञानाची नवी दारे उघडा!’ विद्यार्थ्यांच्या मनात वाचनाविषयी आवड निर्माण करण्यासाठी ललित कुमार फिरके यांनी आपल्या मनोगतातून अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश दिला.  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवन, त्यांचे विचार आणि ज्ञानाप्रती असलेली निष्ठा विद्यार्थ्यांसाठी सदैव प्रेरणादायी आहेत. विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करून आपल्या स्वप्नांना ज्ञानाची जोड द्यावी, हाच वाचन प्रेरणा दिनामागील मुख्य उद्देश असल्याचेही फिरके यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचा पुस्तकांशी संवाद -  वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी किमान एक तास बालवाङ्मयातील पुस्तकांचे वाचन केले. पुस्तकांच्या सहवासातून विद्यार्थ्यांना नवनवीन माहिती मिळावी, कल्पनाशक्तीला चालना मिळावी आणि वाचनाची सवय त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावी, या दृष्टीने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शबाना तडवी यांनी केले, तर आभार श्रीमती प्रज्ञा सोनवणे यांनी मानले.

No comments