अखेर बहापुरा ग्रामपंचायत सचिव निलंबित! धर्मवीर युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भैय्या गायकवाड यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आमरण उपो...
अखेर बहापुरा ग्रामपंचायत सचिव निलंबित!
धर्मवीर युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भैय्या गायकवाड यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आमरण उपोषणकर्त्याला न्याय मिळण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल!
मलकापूर प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
मलकापूर : बहापुरा ग्रामपंचायतीच्या कामकाजातील कथित अनियमिततेप्रकरणी ग्रामपंचायत सचिव गजानन पंडित झनके यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. पंचायत समिती, मलकापूर येथील गटविकास अधिकाऱ्यांनी यासंदर्भात निलंबनाचा आदेश जारी केला आहे.धर्मवीर युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भैय्या गायकवाड यांनी आमरण उपोषणकर्त्याला उपोषण सोडवताना दिलेल्या आश्वासनानंतर या प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले. त्यानंतर संबंधित प्रकरणातील चौकशी अहवालाच्या आधारे ग्रामपंचायत सचिव गजानन पंडित झनके यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे आदेशातून समोर आले आहे.
पंचायत समिती, मलकापूर येथील चौकशी अधिकारी तथा विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी सादर केलेल्या सुधारित अंतिम चौकशी अहवालात बहापुरा ग्रामपंचायतीच्या कामकाजातील अनियमिततेचा उल्लेख करण्यात आला होता. या अहवालाच्या आधारे संबंधित ग्रामपंचायत सचिवांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.गटविकास अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील तरतुदींनुसार कर्तव्यभंगाचा मुद्दा नमूद करण्यात आला असून, संबंधित सचिवांना आदेशाच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले आहे.आश्वासनानंतर कारवाई; पुढील घडामोडींकडे लक्ष!
आमरण उपोषणकर्त्याला उपोषण सोडवताना दिलेल्या आश्वासनानंतर संबंधित प्रकरणात निलंबनाची कारवाई झाल्याने या घडामोडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजात पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने या प्रकरणाकडे पाहिले जात आहे.धर्मवीर युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भैय्या गायकवाड यांनी दिलेल्या आश्वासनानंतर अखेर ग्रामपंचायत सचिव गजानन पंडित झनके निलंबित झाल्याने बहापुरा ग्रामपंचायत प्रकरण चर्चेत आले आहे.

No comments