adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर जे टी महाजन कॉलेज ऑफ इंजीनियरिंगला क्रीडाक्षेत्रात दुहेरी मुकुट

फैजपूर जे टी महाजन कॉलेज ऑफ इंजीनियरिंगला क्रीडाक्षेत्रात दुहेरी मुकुट इदू पिंजारी फैजपुर  (संपादक : हेमकांत गायकवाड) डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

फैजपूर जे टी महाजन कॉलेज ऑफ इंजीनियरिंगला क्रीडाक्षेत्रात दुहेरी मुकुट



इदू पिंजारी फैजपुर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी लोणेरे अंतर्गत दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी लोणेरे येथे धनुर्विद्या आंतर विभागीय निवड स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय फैजपूरचा तृतीय वर्ष कॉम्पुटरचा विद्यार्थी निखिल संतोष पाटील याने भारतीय धनुर्विद्या या क्रिडाप्रकारात डी.बाटू लोणेरे विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावून जे. टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय फैजपूरचे नाव क्रीडा क्षेत्रात उंचावण्यास मोलाची कामगिरी केलेली आहे.अखिल भारतीय पातळीवरील पुढील स्पर्धा तेजपूर विद्यापीठ, आसाम येथे होणार आहे.नुकतेच जे. टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय फैजपूरच्या सुमित मेढे याने वेटलिफ्टिंग मध्ये ७५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला होता.आता निखिल पाटील याने सुद्धा उल्लेखनीय यश संपादित करून महाविद्यालयास क्रीडा क्षेत्रात दुहेरी मुकुट मिळवून दिला आहे.

                निखिल यास महाविद्यालयीन स्तरावर गौरवांन्वित करून पुढील स्पर्धेत पदक मिळविण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष शरद दादा महाजन, उपाध्यक्ष उल्हासशेठ चौधरी , सचिव विजय झोपे, सहसचिव शशिकांत चौधरी इतर सन्माननीय संचालक, प्राचार्य डॉ. के जी पाटील, उपप्राचार्य डॉ. जी ई चौधरी, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.निखिल यास महाविद्यालयाचे क्रीडा संचालक विकास महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments