adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा शहरात समाजकार्य महाविद्यालयाचे "स्वच्छता हि सेवा अभियान" उत्साहात संपन्न

चोपडा शहरात समाजकार्य महाविद्यालयाचे "स्वच्छता हि सेवा अभियान" उत्साहात संपन्न चोपडा प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) चोपडा :...

चोपडा शहरात समाजकार्य महाविद्यालयाचे "स्वच्छता हि सेवा अभियान" उत्साहात संपन्न





चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


चोपडा : भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथील "राष्ट्रीय सेवा योजना" विभागाच्या वतीने "स्वच्छता हि सेवा" या अभियाना अंतर्गत चोपडा बसस्थानक परिसर व चोपडा शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 

"स्वच्छता हि सेवा" या मोहिमे अंतर्गत "एक दिवस, एक तास, एक साथ" या देशव्यापी श्रमदान उपक्रमात समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी "स्वच्छ गाव परिसर" या विषयावर चोपडा बसस्थानक येथे पथनाट्य सादर केले. 

यामध्ये विद्यार्थ्यांनी आपला परिसर कसा स्वच्छ ठेवला पाहिजे याविषयी जनजागृती केली. तसेच "स्वच्छ गाव सुंदर गाव", प्लास्टिक टाळा, कापडी पिशवीचा वापर करा, आपला परिसर स्वच्छ ठेवूयात असा संदेश त्यांनी पथनाट्य आणि घोषणा, पोस्टरच्या माध्यमातून लोकांना दिला. 

याप्रसंगी मा. संदेश क्षिरसागर, (आगार व्यवस्थापक, बसस्थानक, चोपडा), प्रा. डॉ. मोहिनी उपासनी, प्रा. डॉ. संबोधी देशपांडे, प्रा. डॉ. उत्तम सोनकांबळे, सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.

यानंतर चोपडा शहरामध्ये विद्यार्थ्यांनी रॅली काढून, त्यामध्ये स्वच्छ आणि सुंदर परिसराच्या घोषणा देण्यात आल्या. यानंतर चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, तेथील परिसराची स्वच्छता करण्यात आली. 

यानंतर चोपडा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तेथील परिसराची स्वच्छता विद्यार्थ्यांनी केली. 

विद्यार्थ्यांनी या स्वच्छतेच्या अभियाना अंतर्गत स्वतः परिसर स्वच्छता करून, श्रमदान करून, पथनाट्याच्या माध्यमातून, रॅली आणि घोषणा देऊन या अभियानात सक्रिय सहभाग घेतला. 

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मा. संदेश क्षिरसागर,(आगार व्यवस्थापक, बसस्थानक, चोपडा), डॉ. ईश्वर सौंदाणकर, (प्राचार्य, समाजकार्य महाविद्यालय, चोपडा), प्रा. डॉ. आशिष गुजराथी, (उपप्राचार्य, समाजकार्य महाविद्यालय, चोपडा), प्रा. डॉ. मोहिनी उपासनी,(समाजकार्य महाविद्यालय, चोपडा), प्रा. डॉ. संबोधी देशपांडे,(कार्यक्रम अधिकारी), प्रा. डॉ. उत्तम सोनकांबळे, (सहाय्यक, कार्यक्रम अधिकारी), सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

No comments