रावेर येथे महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती सोहळा उत्साहात साजरा दिंडीने वाढविली सोहळ्याची शोभा; महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याचे मान्यवरांचे आव...
रावेर येथे महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती सोहळा उत्साहात साजरा
दिंडीने वाढविली सोहळ्याची शोभा; महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याचे मान्यवरांचे आवाहन
रावेर प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
रावेर, दि. २६ ऑक्टोबर २०२६ : आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्सव समिती, रावेर तालुका यांच्या वतीने रावेर येथे महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात दिंडीने विशेष शोभा आणली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. ब्रिजलाल तुकाराम तायडे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये हिंदू जागरण समितीचे प्रमुख दत्तनाथ योगी महाराज यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. रंजना पाटील, अशोक कांडेलकर, माजी नगराध्यक्ष संगीता महाजन, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, माजी सरपंच श्रीकांत महाजन, वाय. व्ही. पाटील, दिनेश पाटील, राहुल पाटील, विजय महाजन, लखन महाजन, अरुण अस्वर, भूषण महाजन, उमेश महाजन, नायब तहसीलदार आर. डी. पाटील, महेंद्र पाटील, सुनील कोंडे, सुरेश पाटील, अंबिका व्यायामशाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन, चंद्रकांत भोलाणे, प्रमोद पाटील, मनोहर तायडे, नगरसेविका प्रमिला पाटील, योगिता महाजन, अर्चना पाटील, सीमा जमादार, माजी पंचायत समिती सभापती कविता कोळी, योगिता वानखेडे, आत्माराम कोळी, ब्रिजलाल कोळी, चंद्रकांत कोळी आणि साधना कोळी आदी उपस्थित होते.
महापुरुषांचे विचार डोक्यात रुजले पाहिजेत : दत्तनाथ योगी महाराज
यावेळी मनोगत व्यक्त करताना दत्तनाथ योगी महाराज म्हणाले की, भारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमांमध्ये डीजेचा वापर करण्याची पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. महापुरुषांचे विचार आपल्या डोक्यात आणि आचरणात आले पाहिजेत. युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे. महापुरुषांना आपण जाती-जातींमध्ये विभागून घेतले आहे, ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे कोणताही उत्सव डीजेमुक्त पद्धतीने साजरा व्हावा, असे आवाहन त्यांनी केले.
दिंडीने उत्सवाची शोभा वाढविली : पद्माकर महाजन
माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, या उत्सवात दिंडीने विशेष शोभा आणली आहे. प्रत्येकाने डीजेमुक्त उत्सवाचा मार्ग अवलंबावा, असे आवाहन त्यांनी केले.
महर्षी वाल्मिकींचे रामायण मानवहिताचा अमूल्य ठेवा : अशोक कांडेलकर
अशोक कांडेलकर यांनी सांगितले की, रामायणामध्ये मानवी जीवनाच्या हिताच्या असंख्य बाबी सांगण्यात आल्या आहेत आणि या महान ग्रंथाचे लेखक महर्षी वाल्मिकी आहेत. रामायणाचे वाचन परदेशातही केले जाते. आध्यात्मिक कार्यक्रमांमुळे मनाला शांतता लाभते. या उत्सवातून प्रत्येकाने आदर्श घ्यावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश आत्मसात करून आपण वाटचाल केली पाहिजे. शिक्षणामुळे अनेक अनर्थ टाळता येतात, असेही त्यांनी नमूद केले.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्रिजलाल तुकाराम तायडे यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
या कार्यक्रमासाठी आमदार अमोल जावळे, अध्यक्ष रवींद्र पाटील आणि राजन लासुरकर,कविता कोळी, राजकन्या कोळी,प्रभाकर अप्पा सोनवणे,यांच्यासह विविध मान्यवरांचा उल्लेख करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरलाल कोळी यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय तायडे यांनी केले, तर आभार मनोहर कोळी यांनी मानले.
उत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य
महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्सव समितीची पुढीलप्रमाणे पदाधिकारी व सदस्यांची रचना आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष :
श्री. ब्रिजलाल तुकाराम तायडे
उत्सव समिती अध्यक्ष :
विनोद रामचंद्र कोळी (शिवा भाईजी), पुनखेडा
उपाध्यक्ष :
- शरद कोळी – तांदलवाडी
- सुभाष सपकाळे – सुनोदा
- ईश्वर तायडे – गोलवाडा
सचिव :
भूषण तायडे – रावेर
सहसचिव :
संतोष कोळी – गाते
खजिनदार :
योगेश्वर कोळी – तांदलवाडी
सल्लागार :
- चंद्रकांत कोळी – पुरी
- सदाशिव कोळी – उदळी
- हरलाल कोळी – कांडवेल
- दत्तात्रय तायडे – तांदलवाडी
- संतोष अप्पा कोळी – सिंगत
- आत्माराम कोळी – धामोडी
समिती सदस्य :
- मनोहर कोळी – सुलवाडी
- विजय कोळी – अजनाड
- विनोद कोळी – नेहता
- संदीप महाले – निंभोरा
- दीपक तायडे – लहान वाघोदा
- सुपडू मोरे – थोरगव्हाण
- कैलास कोळी – कांडवेल
- गणेश सपकाळे – सुनोदा
- विक्की कोळी – चोरवड
- शुभम कोळी – निबोल
- बाळू कोळी – वाघाडी
- अतुल कोळी – मांगलवाडी
- विजय सपकाळे – सुनोदा
- किरण कोळी – अटवाडे
- समाधान कोळी – पातोंडी
- अशोक कोळी – लहान वाघोदा
- जयराम कोळी – ऐनपूर
महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक एकोपा, शिक्षणाचे महत्त्व आणि व्यसनमुक्त समाजाचा संदेश देत हा जयंती सोहळा उत्साहात पार पडला.



No comments