adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगाव महामोर्चासाठी मुक्ताईनगरातून जोरदार तयारी! महामोर्चाच्या नियोजनासाठी रेस्ट हाऊसवर महत्त्वपूर्ण बैठक; मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार

जळगाव महामोर्चासाठी मुक्ताईनगरातून जोरदार तयारी! महामोर्चाच्या नियोजनासाठी रेस्ट हाऊसवर महत्त्वपूर्ण बैठक; मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा न...

जळगाव महामोर्चासाठी मुक्ताईनगरातून जोरदार तयारी!

महामोर्चाच्या नियोजनासाठी रेस्ट हाऊसवर महत्त्वपूर्ण बैठक; मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार



मुक्ताईनगर प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


मुक्ताईनगर, दि.१ ऑक्टोबर :जळगाव येथे आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी महामोर्चाच्या नियोजन व पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथील रेस्ट हाऊस येथे महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, विविध संघटनांचे कार्यकर्ते तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान आगामी जळगाव महामोर्चाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मोर्चाची तयारी, तालुक्यातून सहभागी होणाऱ्या समाजबांधवांची संख्या, कार्यकर्त्यांची जबाबदारी तसेच मोर्चा यशस्वी करण्यासाठी आवश्यक नियोजन याबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपापली मते मांडली.

यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच रिपब्लिकन सेनेचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जळगाव येथे होणाऱ्या महामोर्चात मुक्ताईनगर तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीस भारतीय बौद्ध महासभेचे नाशिक विभाग सचिव के. वाय. जी. सुरवाडे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष लखन पानपाटील, जिल्हा उपाध्यक्ष अजय शेलार, जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय वाघ, जिल्हा समाजप्रमुख निलेश सूर्यवंशी, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष अतुल अटकाळे, राहुल पानपाटील, मुक्ताईनगर शहराध्यक्ष लकी गाढे, रावेर तालुकाध्यक्ष जितू इंगळे, दीपक इंगळे, विक्रम हिरोळे, नाना बोदडे, अमर बोदडे, शैलेश वानखेडे, राजू वानखेडे, सतीश हिरोळे, रमेश बोदडे, बंटी नरवाड, पृथ्वीराज बोदडे, पत्रकार सचिन झनके, सचिन बोदडे, दीपक गाढे, अजय तायडे, निखिल झणमे, प्रणित कोठके, आशुतोष निकम यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.

महामोर्चासाठी तालुकानिहाय तयारीला वेग

जळगाव महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, अधिकाधिक समाजबांधवांनी मोर्चात सहभागी व्हावे यासाठी जनसंपर्क व नियोजनावर भर देण्यात येत आहे. आगामी काळात मोर्चाच्या यशस्वीतेसाठी व्यापक पातळीवर तयारी करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

No comments