adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पाचोरा येथे शिक्षक परिषदेचे आयोजन

पाचोरा येथे शिक्षक परिषदेचे आयोजन पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा उर्दू केंद्रातील मासिक शिक्षक परिषदेत निपुण अभियानावर बोलताना शिक्षक, केंद्रप...

पाचोरा येथे शिक्षक परिषदेचे आयोजन



पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा उर्दू केंद्रातील मासिक शिक्षक परिषदेत निपुण अभियानावर बोलताना शिक्षक, केंद्रप्रमुख शेख जावेद रहीम आणि इतर दिसत आहेत.


लियाकत शाह जळगांव

(संपादक : हेमकांत गायकवाड)


जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात, गोराडखेडा उर्दू केंद्रातील मासिक 'शिक्षक परिषद' बुधवारी मौलाना आझाद हॉलमध्ये संपन्न झाली. केंद्रप्रमुख शेख जावेद रहीम यांनी परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. पिंपळगाव हरेश्वर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेने परिषदेचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने झाली. तज्ज्ञांनी शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात, केंद्रप्रमुखांनी शेख जावेद रहीम यानी शिक्षकांना त्रैमासिक पालक-शिक्षक बैठकांसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. 'वीरगाथा' उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन आणि शौर्यावरही प्रकाश टाकण्यात आला.

परिषदेत 'निपुण महाराष्ट्र अभियान'ची उद्दिष्ट्ये आणि अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा झाली. जिल्हास्तरीय शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि वास्तव पडताळणीच्या आराखड्याचे विश्लेषणात्मक सादरीकरण करण्यात आले. मासिक पाठ नियोजनाच्या विविध महत्त्वाच्या पैलूंवरही चर्चा झाली.

स्वागत आणि निरोप समारंभ

नवनियुक्त शिक्षक सालेहा अन्सारी, याह्या तबस्सुम, अन्सारी समरीन आणि शेख शाहिद यांचा केंद्रातर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नवीन शिक्षकांनी स्वतःची ओळख करून दिली आणि शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली.

पाचोरा येथून बदली होऊन आलेल्या शिक्षक शेख अशफाक यांना केंद्राने भावपूर्ण निरोप दिला. केंद्रासाठी उत्कृष्ट शैक्षणिक योगदान देणाऱ्या शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन अबू उबैदा यांनी केले आणि अशफाक अन्सारी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने परिषदेची सांगता झाली.


No comments