adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विवाहपूर्व समुपदेशनातून किशोरवयीन मुलींमध्ये निर्णयक्षमता व आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथे विवाहपूर्व समुपदेशन व्याख्यान कार्यशाळा उत्साहात

विवाहपूर्व समुपदेशनातून किशोरवयीन मुलींमध्ये निर्णयक्षमता व आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथे विवाहपूर्...

विवाहपूर्व समुपदेशनातून किशोरवयीन मुलींमध्ये निर्णयक्षमता व आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न

समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथे विवाहपूर्व समुपदेशन व्याख्यान कार्यशाळा उत्साहात




चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


चोपडा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या आजीवन अध्यापन व विस्तार विभाग आणि भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने “किशोरवयीन मुलींना विवाहपूर्व समुपदेशन व्याख्यान कार्यशाळा” उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. पूनमताई गुजराथी, अध्यक्षा, भगिनी मंडळ, चोपडा होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. अश्विनीताई गुजराथी, सहसचिव, भगिनी मंडळ, चोपडा यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून मा. सौ. छायाताई गुजराथी, उपाध्यक्षा, भगिनी मंडळ, चोपडा तसेच विद्यापीठ नियुक्त सिनेट सदस्य प्रा. डॉ. कांचन महाजन उपस्थित होत्या.उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ ईश्वर सौंदाणकर, उपप्राचार्य डॉ आशिष गुजराथी , इनरव्हील क्लब ऑफ चोपडाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

कार्यशाळेत प्रा. डॉ. कांचन महाजन यांनी “विवाह म्हणजे दोन व्यक्तिमत्त्वांचे एकत्र येणे” या विषयावर विद्यार्थिनींशी संवाद साधला. विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा संबंध नसून दोन व्यक्तिमत्त्वे, कुटुंबे आणि जीवनदृष्टी यांचा समन्वय असल्याचे त्यांनी सांगितले. विवाहपूर्व काळात योग्य निर्णयक्षमता, परस्पर समज, संवाद आणि जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मा. अध्यक्ष पूनमताई गुजराथी यांनी “विवाहातील अॅडजस्टमेंट व समायोजन” या विषयावर मार्गदर्शन केले. वैवाहिक जीवनात परस्परांचा आदर, संवाद, समजूतदारपणा आणि परिस्थितीनुसार सकारात्मक समायोजन यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

प्रा. डॉ. रेवानंद पाटील यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना विवाह व कौटुंबिक जीवनातील विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. मा. सौ. जयश्री चव्हाण , सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, चोपडा यांनी जीवनमूल्ये, जबाबदारी आणि योग्य निर्णय घेण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच मा. वैद्य सौ. प्राजक्ता महाले, आयुर्वेदाचार्य, चोपडा यांनी आरोग्य व संघर्षनिवारणाशी संबंधित विषयावर मार्गदर्शन केले. विवाहपूर्व काळात शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी, निरोगी जीवनशैली आणि समायोजनाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थिनींना समजावून सांगितले.

कार्यशाळेच्या निमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व स्मृतिचिन्हास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

विवाहपूर्व समुपदेशनाच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये योग्य निर्णयक्षमता, आत्मविश्वास, आरोग्यजाणीव, आर्थिक नियोजन, कौटुंबिक जीवनातील समायोजनाची तयारी आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न या कार्यशाळेत करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राहुल निकम यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. मोहिनी उपासनी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. मारोती गायकवाड यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ ईश्वर सौंदाणकर, उपप्राचार्य डॉ आशिष गुजराथी, प्रा. डॉ. संबोधी देशपांडे, डॉ. विनोद रायपुरे, डॉ. नारसिंग वळवी, रुपाली देसाई,श्री अजय बारी, अजय भाट, प्रमोद वाघ, श्री. चित्ते , अमोल गुजराथी, सोमनाथ बारी, देवेंद्र पाटील, नितीन पवार, दीपक माळी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थिनींचे मोलाचे योगदान लाभले.

कार्यशाळेच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींना विवाह, आरोग्य, व्यक्तिमत्त्व, समायोजन आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांविषयी शास्त्रीय व समुपदेशनात्मक दृष्टिकोन मिळाल्याने उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

No comments