adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोथळी येथील जुन्या मुक्ताई मंदिरात 23 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह सोहळा रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ पारायणाचे आयोजन

 कोथळी येथील जुन्या मुक्ताई मंदिरात 23 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह सोहळा रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ पारायणाचे आयोजन   किरण धायले अंतुर्ली. (संपाद...

 कोथळी येथील जुन्या मुक्ताई मंदिरात 23 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह सोहळा

रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ पारायणाचे आयोजन 


 किरण धायले अंतुर्ली.

(संपादक - हेमकांत गायकवाड) 

कोथळी- मुक्ताईनगर (जुने मंदिर) यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सोमवार, दि. 23 नोव्हेंबर 2026 रोजी तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्तिक शुद्ध चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर गोरज मुहूर्तात हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. यानिमित्ताने रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ पारायणाचेही आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात दुपारी 12 ते 4 या वेळेत रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ पारायणाने होणार असून, पारायणाचे वाचन ह.भ.प. सौ. दुर्गा संतोष मराठे (मुक्ताईनगर) करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 4 ते 6 या वेळेत तुळशी विवाह विधी सोहळा पार पडणार आहे. तसेच सहा ते सात या दरम्यान भोजन प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या ग्रंथ पारायणात उपवर मुला-मुलींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच परिसरातील भाविक भक्तांनी सहकुटुंब, सहपरिवार व इष्टमित्रांसह उपस्थित राहून धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हा संपूर्ण कार्यक्रम कोथळी येथील जुन्या मुक्ताई मंदिरात होणार असून, तुळशी विवाहाचे यजमानपद सुधाकर रामदास सापधरे (मुक्ताईनगर) भूषविणार आहेत.कार्यक्रमाचे आयोजन श्री संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रविंद्र प्रल्हादराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

No comments