adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दुष्काळात कर्जवसुलीची दादागिरी खपवून घेणार नाही ! सक्ती, धमकी व बेकायदेशीर वसुली करणाऱ्या वित्तीय संस्थांवर कठोर कारवाईचा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांचा इशारा

दुष्काळात कर्जवसुलीची दादागिरी खपवून घेणार नाही ! सक्ती, धमकी व बेकायदेशीर वसुली करणाऱ्या वित्तीय संस्थांवर कठोर कारवाईचा जिल्हाधिकारी डॉ. भ...

दुष्काळात कर्जवसुलीची दादागिरी खपवून घेणार नाही !

सक्ती, धमकी व बेकायदेशीर वसुली करणाऱ्या वित्तीय संस्थांवर कठोर कारवाईचा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांचा इशारा


लातूर, जि. प्र. (उत्तम माने, 8484878818)

(संपादक : हेमकांत गायकवाड)


लातूर:- जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी व कर्जदार आर्थिक संकटात असताना स्मॉल फायनान्स, मायक्रोफायनान्स व खासगी वित्तीय संस्थांनी कर्जवसुलीसाठी सक्ती, धमकी, अपमानास्पद वर्तन किंवा हिंसक मार्गाचा अवलंब करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिले. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून कर्जदारांचा मानसिक छळ अजिबात सहन केला जाणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला. खासगी वित्तीय संस्थांविरोधातील तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते. एकरकमी कर्जफेड करू इच्छिणाऱ्यांचे अर्ज स्वीकारून योग्य कार्यवाही करावी तसेच राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून कर्जविवाद सामोपचाराने सोडवावेत,असे निर्देश त्यांनी दिले. नियमबाह्य वसुली, धमकी किंवा अनधिकृत दबाव टाकल्यास संबंधितांवर पोलीस व जिल्हा प्रशासनामार्फत कठोर दंडात्मक फौजदारी आणि कारवाई केली जाईल, असे त्यांनी बजावले.

बैठकीस जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. आठवले, संबंधित विभागांचे अधिकारी, वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी व कर्जदार उपस्थित होते.

No comments