सहकार भारती आयोजित पतसंस्था पदाधिकारी कार्यशाळा जळगावात उत्साहात सम्पन्न जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाऊ नारखेडे यांची माहिती इदू पिंजारी फैजपूर (...
सहकार भारती आयोजित पतसंस्था पदाधिकारी कार्यशाळा जळगावात उत्साहात सम्पन्न
जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाऊ नारखेडे यांची माहिती
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
फैजपूर सहकार भारती जळगाव व सहकार भारती प्रशिक्षण केंद्र पुणे यांचे संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे करीता संपूर्ण एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच जळगाव येथे पार पडल्याची माहिती सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाऊ नारखेडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधी यांना दिली
या कार्यशाळेत सुमारे 80 प्रतिनिधी उपस्थित होते
कार्यक्रमास राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष डा शांतीलाल सिंगी संभाजीनगर व सहकार प्रशिक्षन केंद्र संचालक अमित ओझे पनवेल डा सुरेश पांडे प्रा सि ए व जेष्ठ विचारवंत प्रकाश पाठक यांनी मार्गदर्शन केले संस्थेची गुणात्मक वाढ नफा क्षमता कर्मचारी गुणवत्तापूर्ण कामकाज संस्थेचे निर्णयात संचालकांचा सहभाग सुरक्षित गुंतवणूक सामाजिक बांधिलकी
सभासद ना सेवा पुरवठा एकूणच देशाचे अर्थव्यवस्थेत पतसंस्थाचा सहभाग व स्पर्धामध्ये टिकून राहण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असून या सर्व मुद्यांवर वक्त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले व चर्चात्मक सुसंवाद साधला कार्यशाळा उदघाटन जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने व बँक असोसिएशन अध्यक्ष चंद्रहास गुजराथी प्रशिक्षण संस्था अध्यक्ष संजय बिर्ला राष्ट्रीय संघटन प्रमुख दिलीप रामू पाटील उपाध्यक्ष शरद जाधव अध्यक्ष नरेंद्रभाऊ नारखेडे यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले महामंत्री शशिकांत बेहडे व शहर महामंत्री प्रमोद नवलकर जयदीप शहा यांनी पाहुण्यांचा परिचय व सत्कार केला सूत्र संचलन उपाध्यक्ष शरद जाधव यांनी केले कार्यक्रमास सहकार भारती शहर अध्यक्ष सौ शोभा पाटील उपाध्यक्ष सुधीर आबा पाटील चाळीसगाव मेडिकल असोसिएशन अध्यक्ष सुनील भंगाळे गंगाराम गवळी पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख प्रशांत केले सविता नाईक यासह सहकार भारती पदाधिकारी व पतसंस्था अध्यक्ष व उपाध्यक्ष व व्यवस्थापक यांची उपस्थिती लाभली होती कार्यक्रम अध्यक्ष संजय जी बिर्ला उपाध्यक्ष शरद जाधव राष्ट्रीय संघटन प्रमुख दिलीप पाटील जिल्हा अध्यक्ष नरेन्द्र भाऊ नारखेडे यांचे मार्गदर्शन खालील पार पडला.

No comments