adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी उमेश पाटील, उपसभापतीपदी पंकज चौधरी यांची सर्वानुमते निवड* यावल तालुका सहाय्यक निबंधक कुणाल सोनार यांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया पार ; सचिव स्वप्निल सोनवणे यांचे सहकार्य*

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी उमेश पाटील, उपसभापतीपदी पंकज चौधरी यांची सर्वानुमते निवड यावल तालुका सहाय्यक निबंधक कुणाल सोनार ...

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी उमेश पाटील, उपसभापतीपदी पंकज चौधरी यांची सर्वानुमते निवड

यावल तालुका सहाय्यक निबंधक कुणाल सोनार यांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया पार ; सचिव स्वप्निल सोनवणे यांचे सहकार्य


जळगाव यावल -प्रतिनिधी:-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी * उमेश प्रभाकर पाटील (आमोदा) तर उपसभापतीपदी पंकज दिनकर चौधरी (वड्री) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

ही निवड यावल तालुका सहाय्यक निबंधक कुणाल सोनार* यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यांना संस्थेचे सचिव स्वप्निल सोनवणे यांनी सहकार्य केले.

आज दिनांक ४ नोव्हेंबर रोजी बाजार समितीच्या सभागृहात संचालक मंडळाची सर्वसाधारण बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला महायुतीचे सर्व १९ संचालक उपस्थित होते.

सर्वप्रथम मावळते सभापती उज्जैनसिंग भाऊलाल राजपूत व उपसभापती श्री. दिपक नरोत्तम चौधरी यांनी दिलेले राजीनामे मंजूर करण्यात आले. महायुतीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार सर्वांना सभापतीपदाचा सन्मान मिळावा, सर्वांना समान संधी मिळावी, या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामे दिले होते.

त्यानंतर सहाय्यक निबंधक कुणाल सोनार यांनी निवडीची प्रक्रिया सुरू केली. सभापती पदासाठी उमेश पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला सर्व संचालकांनी एकमताने अनुमोदन दिले. त्याचप्रमाणे उपसभापती पदासाठी पंकज चौधरी यांच्या नावालाही सर्वानुमते संमती मिळाली. त्यामुळे दोन्ही निवडी बिनविरोध, सर्वानुमते जाहीर करण्यात आल्या.

*नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार*

निवड जाहीर होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. सहाय्यक निबंधक कुणाल सोनार, मावळते सभापती उज्जैनसिंग राजपूत, मावळते उपसभापती दिपक चौधरी व सर्व संचालकांनी नूतन सभापती उमेश पाटील व उपसभापती पंकज चौधरी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

*मान्यवरांची उपस्थिती*

यानिवडीप्रसंगी भाजपाचे कार्यकर्ते व मान्यवर हिरालाल चौधरी, 

 विलास चौधरी, 

. लहू पाटील, सलीम तडवी* आदींसह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते

बैकीला राकेश फेगडे, दगडू कोळी, हर्षल पाटील, नारायण चौधरी, सागर महाजन, संजय पाटील, कांचन फालक, राखी बन्हाटे, स्विटी बेंडाळे, विलास पाटील, सुर्यभान पाटील, अशोक चौधरी, निलेश गडे, सुनिल बारी यांच्यासह सर्व संचालक, शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*नूतन सभापतींची प्रतिक्रिया

"सर्व संचालकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभारी आहे. सहाय्यक निबंधक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना मालाला योग्य भाव मिळावा, बाजार समितीचा विकास व्हावा यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार," असे नूतन सभापती उमेश पाटील म्हणाले.

"बाजार समितीचे कामकाज पारदर्शक पद्धतीने चालवू, शेतकरी व व्यापारी यांच्या अडचणी सोडवू," असे उपसभापती पंकज चौधरी यांनी सांगितले. आमदार अमोल जावळे यांनी भ्रमण दूरध्वनीवरून सभापती उपसभापती यांचे स्वागत करीत त्यांना पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments