हर्षदा भगवान कोळी यांच्या पेटंटची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल; संशोधनाचे पेटंट प्रकाशित चोपडा प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) चोपडा : खा...
हर्षदा भगवान कोळी यांच्या पेटंटची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल; संशोधनाचे पेटंट प्रकाशित
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा : खामखेडा येथील रहिवासी आणि पोलीस निरीक्षक भगवान खंडू कोळी यांच्या कन्या मालेगाव येथील एमजीव्हीएस कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनी कु.हर्षदा भगवान कोळी यांनी आपल्या संशोधनाच्या माध्यमातून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या संशोधनाचे पेटंट ३० ऑक्टोबर २०२६ रोजी भारताच्या पेटंट कार्यालयाच्या जर्नल क्रमांक ४४/२०२६ मध्ये प्रकाशित झाले आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हर्षदा कोळी यांनी “A Muscle-Relaxing Effervescent Solid Bath Composition and Method of Preparation Thereof” या विषयावर संशोधन केले आहे. या संशोधनामध्ये स्नायूंना आराम मिळण्यास मदत करणाऱ्या इफर्व्हेसंट (पाण्यात विरघळून फेस निर्माण करणाऱ्या) घन स्वरूपातील बाथ कंपोझिशनची निर्मिती आणि ती तयार करण्याची पद्धत विकसित करण्यात आली आहे.
या पेटंटचा अर्ज क्रमांक २०२६२१०८५२९२ A असा असून, पेटंटचे प्रकाशन ३० ऑक्टोबर २०२६ रोजी झाले आहे. हर्षदा या सहा.पोलीस निरीक्षक श्री.भगवान खंडू कोळी यांच्या कन्या आहेत.
त्यांच्या या संशोधनात्मक यशामुळे कुटुंबीय, महाविद्यालयाचे प्राध्यापक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांकडून त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. शैक्षणिक क्षेत्रात संशोधनाची आवड जोपासत नावीन्यपूर्ण संकल्पनेला मूर्त स्वरूप देणाऱ्या हर्षदा कोळी यांचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
हर्षदा कोळी यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

No comments