adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश स्कूलमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला .

  सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश स्कूलमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला .   भरत कोळी यावल  (संपादक - हेमकांत गायकवाड)  सरदार वल्लभभाई पटेल इं...

 सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश स्कूलमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला .

 


भरत कोळी यावल 

(संपादक - हेमकांत गायकवाड) 

सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतीय संविधान दिन शाळेचे अध्यक्ष डॉ . श्री प्रदीप माहेश्वरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व शाळेच्या मुख्याध्या पीका सौ शिला तायडे मॅडम यांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्या पिका सौ . शिला तायडे मॅडम उपस्थित होत्या. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रावते मॅडम यांनी केले.

शाळेतीलविद्यार्थ्यांनी संविधान दिनानिमित्त भाषणं दिली त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती, त्याचे महत्त्व तसेच प्रत्येक नागरिकाची संविधानाप्रती असलेली कर्तव्ये याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि लोकशाही मूल्यांची जाणीव व्हावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमांमध्ये 26 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या आतंकवादी भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

कार्यक्रमाची सांगता सचिन भालेराव सर यांच्या आभार प्रदर्शनाने झाली .

No comments