adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुक्ताईनगर च्या जखमी सरफराजचा उपचारादरम्यान मृत्यू! फुलगाव उड्डाणपूलाजवळ झाला होता गोळीबार.

  मुक्ताईनगर च्या जखमी सरफराजचा उपचारादरम्यान मृत्यू! फुलगाव उड्डाणपूलाजवळ झाला होता गोळीबार. रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक :- हेमकां...

 मुक्ताईनगर च्या जखमी सरफराजचा उपचारादरम्यान मृत्यू! फुलगाव उड्डाणपूलाजवळ झाला होता गोळीबार.


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

वरणगाव येथील फुलगाव उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर झालेल्या गोळीबाराच्या गंभीर घटनेला आता दुर्दैवी वळण मिळाले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सरफराज सय्यद साकिर सय्यद (वय २४, रा. काजीपुरा, मुक्ताईनगर) याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृत तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने फेकरी येथील भूषण ऊर्फ बिस्ला राजू सावळे (वय २०) आणि सिद्धार्थ रामदास ढिवरे (वय २७) या दोघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास सरफराज याच्याशी इन्स्टाग्रामवरील एका तरुणीच्या नावाने तयार केलेल्या बनावट खात्यावरून संपर्क साधण्यात आला. वारंवार मेसेज आणि कॉल करून त्याला भेटण्याच्या बहाण्याने वरणगाव येथील फुलगाव उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर बोलावण्यात आले.

सरफराज ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच तेथे आलेल्या दोघांनी त्याच्यावर हल्ला चढवला. लोखंडी रॉडने डोक्यावर व पायावर वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. त्यानंतर देशी कट्ट्यातून त्याच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली . हा हल्ला केल्यानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते.

घटनेनंतर रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या सरफराजला तातडीने जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.जळगांव येथील खाजगी दवाखान्यामध्ये डॉक्टरांकडून सरफराज वर उपचार सुरू होते. मात्र, मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान जखमी सरफराज ची प्राणज्योत मालवली.

सरफराज हा कुटुंबातील एकमेव कमावता आधार असल्याची माहिती असून, त्याच्या अकाली निधनाने कुटुंब निराधार झाले आहे.

No comments