adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वरणगांवात गोळीबार! २३वर्षीय तरुणाची प्रकृती चिंताजनक संशयित हल्लेखोर फरार.

  वरणगांवात गोळीबार! २३वर्षीय तरुणाची प्रकृती चिंताजनक संशयित हल्लेखोर फरार. रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक : हेमकांत गायकवाड) भुसावळ ...

 वरणगांवात गोळीबार! २३वर्षीय तरुणाची प्रकृती चिंताजनक संशयित हल्लेखोर फरार.



रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात मुक्ताईनगर शहरातील काजीपुरा परिसरात राहणारा सरफराज सय्यद (वय २३) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. गोळीबारानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती असून, त्याचा शोध सुरू आहे.

डंपर चालक तरुणावर गोळीबार


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सरफराज सय्यद हा डंपर चालक म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. कामानिमित्त तो वरणगाव परिसरात आला असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सरफराजला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

फरार संशयिताचा शोध सुरू गोळीबाराच्या घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाल्याची माहिती आहे.


त्यामुळे पोलिसांसमोर आरोपीचा शोध घेऊन घटनेचा उलगडा करण्याचे आव्हान आहे. दरम्यान, मुक्ताईनगरमधील तरुणावर वरणगाव येथे गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर मुक्ताईनगर परिसरातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेतील जखमी तरुणाची प्रकृती, गोळीबारामागील कारण आणि संशयित आरोपीची ओळख याबाबत अधिकृत माहिती समोर आल्यानंतर प्रकरणातील पुढील तपशील स्पष्ट होणार आहेत.

No comments