adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आ. अमोल जावळ्यांच्या पाठपुराव्याला यश; यावल एसटी आगारात दाखल झाल्या २५ नव्या बसेस!

 आ. अमोल जावळ्यांच्या पाठपुराव्याला यश; यावल एसटी आगारात दाखल झाल्या २५ नव्या बसेस! यावल (प्रतिनिधी) :- (संपादक :- हेमकांत गायकवाड) यावल विध...

 आ. अमोल जावळ्यांच्या पाठपुराव्याला यश; यावल एसटी आगारात दाखल झाल्या २५ नव्या बसेस!


यावल (प्रतिनिधी) :-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे यावल एसटी आगाराला तब्बल २५ नवीन बसेस मिळाल्या आहेत. यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार असून, एसटी आगाराच्या उत्पन्नातही मोठी वाढ होण्यास मदत होईल, अशी माहिती डॉ. कुंदन फेगडे आणि प्रवासी संघटनेचे अध्यक्ष जगदीश कवडीवाले यांनी दिली आहे.

प्रवाशांची मोठी सोय होणार

गेल्या काही काळापासून यावल आगारातील जुन्या बसेसमुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याची गंभीर दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी परिवहन विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून, २५ नवीन अत्याधुनिक बसेस आगारात दाखल झाल्या आहेत. या नवीन गाड्यांमुळे तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि वेळेत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

नवीन बसेसच्या आगमनामुळे प्रवाशांमधून आणि नागरिकांमधून आ. अमोल जावळे यांचे विशेष आभार मानले जात आहेत.

No comments