adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दुष्काळ अग्रिम अनुदानासाठी सामाईक खातेदार शेतकऱ्यांनी संमतीपत्रे सादर करावीत! अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांचे आवाहन

  दुष्काळ अग्रिम अनुदानासाठी सामाईक खातेदार शेतकऱ्यांनी संमतीपत्रे सादर करावीत! अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी प्रभारी तहसीलदार...

 दुष्काळ अग्रिम अनुदानासाठी सामाईक खातेदार शेतकऱ्यांनी संमतीपत्रे सादर करावीत!

अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांचे आवाहन


रावेर प्रतिनिधी : मुबारक तडवी

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यात दुष्काळ अग्रिम अनुदानाची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांची जमीन सामाईक गटात आहे, अशा शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी संबंधित सहहिस्सेदारांचे संमतीपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे अद्याप संमतीपत्रे जमा न केलेल्या शेतकऱ्यांनी ती तातडीने संबंधित तलाठी कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन रावेरचे प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांनी केले आहे.

शेतातील नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असतानाच सामाईक क्षेत्रधारक शेतकऱ्यांना संमतीपत्राबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि, अद्याप काही शेतकऱ्यांनी आवश्यक संमतीपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी विलंब न करता सहहिस्सेदारांची संमतीपत्रे तलाठी कार्यालयात जमा करावीत, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच संबंधित ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी यांनी प्राप्त झालेल्या कागदपत्रांची योग्य पडताळणी करून पुढील कार्यवाही करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. शासनाच्या निर्धारित निकषांनुसार अनुदान वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

दुष्काळ अग्रिम अनुदान तसेच नुकसानभरपाईचा लाभ पात्र व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महसूल प्रशासन प्रयत्नशील असून, आवश्यक कागदपत्रांअभावी कोणताही पात्र शेतकरी अनुदानाच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांनी सांगितले.

No comments