adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चुंचाळे ता.चोपडा येथे दिवाळी सणाच्या निमित्ताने विठ्ठल सार्वजनिक वाचनालय तर्फे पुस्तके व ग्रंथ प्रदर्शन तसेच युनिटी क्लब तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

चुंचाळे ता.चोपडा येथे दिवाळी सणाच्या निमित्ताने विठ्ठल सार्वजनिक वाचनालय तर्फे पुस्तके व ग्रंथ प्रदर्शन तसेच युनिटी क्लब तर्फे रक्तदान शिबिर...

चुंचाळे ता.चोपडा येथे दिवाळी सणाच्या निमित्ताने विठ्ठल सार्वजनिक वाचनालय तर्फे पुस्तके व ग्रंथ प्रदर्शन तसेच युनिटी क्लब तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन


विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी)

(संपादक : हेमकांत गायकवाड)


चुंचाळे ता.चोपडा येथे श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालय व युनिटी क्लब तर्फे दि. ९/११/२६ वार सोमवार रोजी श्री विठ्ठल रुक्माई मंदिर परिसरात पुस्तक प्रदर्शन व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या 

कार्यक्रमाचे उद्घाटक आदर्श शिक्षक.ज्येष्ठ साहित्यिक.कविवर्य.

प्रताप विद्यामंदिर सेवानिवृत्त प्राचार्य श्री अशोक सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून फटाके नकोत तर पुस्तके हवेत हा विचार मांडत जसे आपल्या शरीर विकासासाठी अन्न महत्त्वाचे आहे तसे व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ग्रंथालयातील पुस्तके कपाटात न राहता ती वाचकांच्या हातात पोहोचावीत यासाठी विठ्ठल सार्वजनिक वाचनालयाने केलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगत त्यांनी वाचनालयाचे अभिनंदन केले. ग्रंथालयाची ही ग्रंथसंपदा अनमोल असून ती येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरक आहे. नवीन पिढीच्या हातात मोबाईल ऐवजी पुस्तके असली तर सुदृढ पिढी निर्माण होईल असा विचार त्यांनी मांडला.विठ्ठल सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष बी जी महाजन यांनी वाचनालयाच्या स्थापने पासून कार्याचा आढावा घेतला. दहा हजारांपेक्षा अधिक पुस्तकांचा टप्पा गाठणाऱ्या या वाचनालयाची समृद्धता अधोरेखित केली. युनिटी क्लब तर्फे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने इंडियन रेड क्रॉस सोसायटी शाखा चोपडे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या कार्यक्रमास रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले. या शिबिरास ब्लड बँक चोपडा चेअरमन श्री प्रवीण गुजराथी यांनी भेट देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहित केले युनिटी क्लबचे अध्यक्ष गौरव पाटील यांचे त्यांनी रक्तदान शिबिराचे पाचवे वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. किरण लोहार विद्याश्रीसुंदर राणी अहिरे आशालता शेटे या स्वयंसहायकांनी परिश्रम घेऊन रक्तदान शिबिर यशस्वी केले. या कार्यक्रमाला उपस्थित डॉ.संदीप काळे डॉ. नरेंद्र शिरसागर डॉ. पंकज चौधरी.नगर वाचन मंदिर संचालक चोपडा प्रभाकर महाजन. गोविंद मराठे. नंदलाल पाटील.अक्षय महाजन. विजय चौधरी. ज्ञानेश्वर पाटील.नंदलाल चौधरी. लोटन कुमावत.संजय शिंदे बाबाजी. कल्पेश शिंदे. निलेश महाजन संजय साळुंखे. मयूर कोळी प्रशांत सोनवणे पेंटर.नूतन माध्यमिक विद्यालय प्राचार्य जे यु सोनवणे. शैलेंद्र कुंभार सुनील पाटील. अनंत पाटील दत्तू बापू. लक्ष्मण पाटील. रुपेश पाटील रोहित चौधरी योगेश पाटील सुमित महाजन जयेश महाजन चुंचाळे गावाचे पोलीस पाटील सुनील महाजन यांनी विशेष सहकार्य केले. दिवाळी सणानिमित्त गावातील आजी-माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी पुस्तक वाचकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवल्याने पुस्तक प्रदर्शनाचे तीन दिवसा नंतर समारोप करण्यात आला.

सूत्रसंचालनातून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य प्रा.पंकज शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. कलाम यांचे संदर्भ देऊन पुस्तक आणि वाचनाचे महत्त्व आपल्या प्रास्ताविकातून अधोरेखित केले केले. उपस्थितांचे आभार विठ्ठल सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष महाजन यांनी व्यक्त केले.

No comments