adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दिवाळी निमित्त किल्ले बांधणी उपक्रमाचा गौरवपूर्ण सत्कार सोहळा

दिवाळी निमित्त किल्ले बांधणी उपक्रमाचा गौरवपूर्ण सत्कार सोहळा प्रतिनिधी / कमलेश शेवाळे  (संपादक : हेमकांत गायकवाड) छत्रपती शिवाजी महाराजांचा...

दिवाळी निमित्त किल्ले बांधणी उपक्रमाचा गौरवपूर्ण सत्कार सोहळा


प्रतिनिधी / कमलेश शेवाळे 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास, त्यांचे अतुलनीय शौर्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, तसेच आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचे आणि संस्कृतीचे जतन व्हावे, या उदात्त हेतूने दिवाळी निमित्ताने बदलापूर येथील युवकांनी किल्ले बांधणीचा सुंदर उपक्रम राबविला.

स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे मुंबई जिल्हा प्रभारी श्री. माल्तेश हेब्बारे यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी अत्यंत उत्साहाने आणि शिवरायांप्रती आदरभाव व्यक्त करत किल्ल्यांची निर्मिती केली.त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक व प्रोत्साहन म्हणून संघटनेच्या वतीने सर्व सहभागी युवकांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.आजच्या आधुनिक युगातही नव्या पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्यासाठी आणि आपल्या संस्कृतीची परंपरा पुढे नेण्यासाठी घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.

किल्ले केवळ मातीचे नसतात, तर ते आपल्या इतिहासाचे, स्वाभिमानाचे आणि स्वराज्याच्या विचारांचे प्रतीक असतात. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व युवकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

No comments