adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी चोपड्यात गुन्हा दाखल; विकास निकम यांच्याविरुद्ध चार कलमांन्वये कारवाई

  सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी चोपड्यात गुन्हा दाखल; विकास निकम यांच्याविरुद्ध चार कलमांन्वये कारवाई चोपडा प्रतिनिधी अशोक कोळी :-...

 सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी चोपड्यात गुन्हा दाखल; विकास निकम यांच्याविरुद्ध चार कलमांन्वये कारवाई


चोपडा प्रतिनिधी अशोक कोळी :-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

चोपडा सोशल मीडियाचा वापर करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणे बदनामी केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे चोपडा शहरासह परिसरात चर्चेला सुरुवात झाली आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी भाग ५ गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६१/२०२६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. योगेश भास्कर पाटील (वय ४७, रा. रामानंद नगर, ता. जळगाव, जि. जळगाव) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार विकास ईश्वर निकम रा. मचला, ता. चोपडा जि. जळगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे इन्स्टाग्रामवरील chopdapoliticalcomedy' या अकाउंटवर वेळोवेळी करण्यात आलेल्या पोस्ट तसेच विरवाडा फाट्याजवळील सार्वजनिक रस्त्यावरील प्रकार या तक्रारीशी संबंधित असल्याचे नमूद करण्यात आले आहे

या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २९६, ३५६(२), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य किंवा वक्तव्य करणे, बदनामी करणे, गुन्हेगारी स्वरूपाची तसेच शांतता भंग करण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर अपमान करणे अशा आरोपांचा या कलमांमध्ये समावेश आहे

तक्रारीतील उपलब्ध माहितीनुसार शिवसेना पक्षाचे आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या संदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट किंवा कृत्य केल्याचाही उल्लेख आहे.

सोशल मीडियाचा वापर करताना सामाजिक भान आणि जबाबदारी राखणे आवश्यक असून आक्षेपार्ह मजकूर बदनामीकारक पोस्ट किंवा धमकीच्या माध्यमातून सामाजिक वातावरण दूषित होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.

No comments