adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्हा परिषद मराठी शाळा आव्हाणे येथे संविधान दिन उत्साहात साजरा संविधानिक मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे भगवान चौधरी यांचे आवाहन

  जिल्हा परिषद मराठी शाळा आव्हाणे येथे संविधान दिन उत्साहात साजरा संविधानिक मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे भगवान चौधरी यां...

 जिल्हा परिषद मराठी शाळा आव्हाणे येथे संविधान दिन उत्साहात साजरा

संविधानिक मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे भगवान चौधरी यांचे आवाहन


आव्हाणे प्रतिनिधी :-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

आव्हाणे : जिल्हा परिषद मराठी शाळा, आव्हाणे येथे भारतीय संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा भदाणे सर होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी उपस्थित होते.

यावेळी शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भगवान चौधरी म्हणाले की, शाळा हे संविधानिक मूल्यांचे संस्कार देणारे पहिले महत्त्वाचे केंद्र आहे. विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच संविधानाची ओळख करून देणे, संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करणे तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि लोकशाही या मूल्यांची शिकवण देणे आवश्यक आहे. संविधानातील मूल्ये केवळ अभ्यासापुरती मर्यादित न राहता ती विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आचरणात उतरली पाहिजेत.

भारतीय संविधानाच्या निर्मितीविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, संविधान तयार करण्यासाठी २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला. संविधान सभेची एकूण ११ अधिवेशने झाली. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. मूळ संविधानात ३९५ कलमे, २२ भाग आणि ८ अनुसूच्या होत्या. सध्या संविधानात २५ भाग आणि १२ अनुसूच्या आहेत. आतापर्यंत संविधानात १०६ घटनादुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.

या माहितीचा संदर्भ म्हणून लोकसभा सचिवालयाचे भारतीय संविधानावरील २०२४ चे प्रकाशन तसेच केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाची संविधानाची अधिकृत प्रत यांचा आधार घेण्यात आला.

शेवटी मार्गदर्शन करताना भगवान चौधरी यांनी, "संविधान केवळ पुस्तकात ठेवण्यासाठी नाही, तर ते आपल्या आचरणात आणण्यासाठी आहे," असा संदेश देत विद्यार्थ्यांनी संविधानिक मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता, लोकशाही मूल्यांची जाणीव आणि देशाच्या संविधानाप्रती आदरभाव निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

No comments