चोपड्यात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे सदस्य नोंदणी अभियान उत्साहात दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेत मार्गदर्शन; गजानन योगराज पा...
चोपड्यात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे सदस्य नोंदणी अभियान उत्साहात
दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेत मार्गदर्शन; गजानन योगराज पाटील यांची चोपडा तालुका अध्यक्षपदी निवड
चोपडा प्रतिनिधी : अशोक कोळी
(संपादक - हेमकांत गायकवाड)
मा. ना. आमदार श्री. बच्चूभाऊ कडू साहेब, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने ‘दिव्यांग सदस्य नोंदणी अभियान २०२६’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी चोपडा शहरातील गुरुकुल नगर, ८० फुटी रोड येथील महादेव मंदिर परिसरात दिव्यांग सदस्य नोंदणी कार्यक्रम उत्साहात पार पडला.
चोपडा येथे सदस्य नोंदणीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे चोपडा तालुकाध्यक्ष श्री. आबासाहेब रवींद्र नथ्थू पाटील (खडगाव) यांचे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
या अभियानासाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष (पूर्व) श्री. हरीभाऊ रत्नाबाई विजय पाटील, जिल्हा सचिव श्री. गजाननभाऊ सोनवणे, यावल तालुकाध्यक्ष श्री. प्रतिक पाटील, महिला व बाल तालुकाध्यक्ष श्रीमती योगिताताई पाटील, नायगाव शाखाध्यक्ष श्री. साहेबराव पाटील, दहिगाव शाखाध्यक्ष श्री. डिगंबर चौधरी, किनगाव शाखाध्यक्ष श्री. दीपकभाऊ जाधव, प्रहार सेवक श्री. चंद्रकांत पाटील, किशोर (गोटूमामा) पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सदस्य नोंदणीसाठी सहकार्य केले.
चोपडा तालुका कार्यकारिणीत नवीन नेतृत्व
यावेळी चोपडा तालुक्यातील पूर्वीची कार्यकारिणी बरखास्त करून नवीन तालुका कार्यकारिणी गठित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. चोपडा तालुका अध्यक्षपदी श्री. गजानन योगराज पाटील यांची निवड करण्यात आली.
चोपडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी तालुका कार्यकारिणीत सहभागी होण्यासाठी तसेच विविध पदांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी श्री. गजानन योगराज पाटील यांच्याकडे आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले. संघटनेत पदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या इच्छुकांनी संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या
सदस्य नोंदणीदरम्यान चोपडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. त्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. श्री. आबासाहेब रवींद्र पाटील यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा सचिव श्री. गजाननभाऊ सोनवणे आणि श्री. प्रवीण भाऊसाहेब दोंदवाडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दिव्यांग बांधवांना संघटनेच्या माध्यमातून एकत्र आणून त्यांच्या हक्कांसाठी व विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटना अधिक सक्षम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी नवनियुक्त चोपडा तालुकाध्यक्ष श्री. गजानन योगराज पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधवांचे आभार मानले.
— श्री. हरीभाऊ रत्नाबाई विजय पाटील
जिल्हाध्यक्ष (पूर्व),
प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, जळगाव जिल्हा


No comments