नालंदा बुद्ध विहार, आडगाव येथे ७७ वा भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन; बुद्ध वंदना आणि भीम स्मरणाने कार्...
नालंदा बुद्ध विहार, आडगाव येथे ७७ वा भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा
संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन; बुद्ध वंदना आणि भीम स्मरणाने कार्यक्रमाची सुरुवात
आडगाव, ता. चोपडा : -
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
तालुक्यातील आडगाव येथील नालंदा बुद्ध विहारात ७७ वा भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून तसेच पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत अहिरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमात बौद्धाचार्य सिद्धार्थ बाविस्कर यांनी उपस्थित उपासकांना त्रिशरण, पंचशील, बुद्ध पूजा व भीम स्मरण करून दिले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे स्मरण करून संविधानाप्रती आदर व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी सरनत्य घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी हर्षल बाविस्कर, भूरसिंग बाविस्कर, आनंद भालेराव, सोनू बाविस्कर, आर्यन बाविस्कर, अविनाश बाविस्कर, प्रांजल बाविस्कर यांच्यासह अनेक बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होते.
भारतीय संविधानाने दिलेल्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव समाजात रुजविण्याच्या उद्देशाने हा संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

No comments