adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कुष्ठधाम अंभोरा येथे रोगमुक्त ज्येष्ठांसोबत दिवाळी उत्सव; डॉ. एन. टी. डाहेलकर यांची जयंती साजरी

कुष्ठधाम अंभोरा येथे रोगमुक्त ज्येष्ठांसोबत दिवाळी उत्सव; डॉ. एन. टी. डाहेलकर यांची जयंती साजरी                    सौ. कमलाताई पालकर यांचा १...

कुष्ठधाम अंभोरा येथे रोगमुक्त ज्येष्ठांसोबत दिवाळी उत्सव; डॉ. एन. टी. डाहेलकर यांची जयंती साजरी                   

सौ. कमलाताई पालकर यांचा १५ ते २० वर्षांपासून अविरत सामाजिक उपक्रम; फराळ, फळे, मिठाई व साडी-चोळी भेट देत वृद्धांसोबत साजरी केली दिवाळी




अकोला प्रतिनिधी :- 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

सण-उत्सवांचा खरा आनंद हा समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन साजरा करण्यात असतो. याच सामाजिक बांधिलकीची प्रचिती मुर्तिजापूर तालुक्यातील ग्राम अंभोरा येथील कुष्ठधाममध्ये आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही रोगमुक्त ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसोबत दिवाळीचा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात व आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सौ. कमलाताई पालकर यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात दिवाळीनिमित्त फराळ, फळे, मिठाई तसेच साडी-चोळी अशा भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या प्रेमळ भेटींमुळे कुष्ठधाममधील ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आणि दिवाळीचा उत्साह द्विगुणित झाला.याच दिवशी म्हणजे ७ नोव्हेंबर रोजी कुष्ठरोग तंत्रज्ञ म्हणून आरोग्य विभागात उल्लेखनीय सेवा बजावून काटेपूर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कुरणखेड येथून सेवानिवृत्त झालेले डॉ. एन. टी. डाहेलकर यांची जयंती असल्याने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देणाऱ्या त्यांच्या कार्याचे यावेळी स्मरण करण्यात आले.या कार्यक्रमाला आरोग्य सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या सौ. कमलाताई पालकर, हरिष मसके, सचिन शहाकर, डॉ. एन. टी. डाहेलकर स्मृती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सुनील डाहेलकर, कलाविष्कार कला साहित्य संस्थेचे संस्थापक तथा पत्रकार मिलिंद इंगळे, माजी सैनिक मनोहर, कृष्णदास चांदुरकर, कृष्णा (गुड्डू) पालकर आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय कुष्ठधाममधील रोगमुक्त ज्येष्ठ नागरिक व महिलांचीही उपस्थिती होती.संत गाडगेबाबा जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. अनिल भाऊ शिंदे यांच्या पुढाकारातून आणि सौ. कमलाताई पालकर यांच्या सेवाभावी वृत्तीतून हा दिवाळीचा आनंदोत्सव गेल्या १५ ते २० वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत आहे. कुष्ठधाममधील वृद्धांनाही सण-उत्सवांचा आनंद घेता यावा, त्यांना आपलेपणाची जाणीव व्हावी आणि समाजाचा स्नेह मिळावा, या उदात्त भावनेतून हा उपक्रम दरवर्षी न चुकता आयोजित केला जातो. सामाजिक बांधिलकी जपत अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने माणुसकीचा आदर्श निर्माण करणारा आहे.संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. अनिल डाहेलकर हे देखील गेल्या चार वर्षांपासून कुष्ठधाम येथे संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करीत आहेत. विशेष म्हणजे, स्वतःच्या वाढदिवसानिमित्तही त्यांनी येथे सहभोजनासह दोन सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.समाजातील वंचित आणि गरजू घटकांसोबत आनंदाचे क्षण वाटून घेण्याची त्यांची ही भूमिका उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली .येत्या २० डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच त्यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून कुष्ठधाम येथे भजन, कीर्तन आणि अभिवादनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस सचिन भाऊ शहाकर व हरिभाऊ मसके यांनी यावेळी व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. अनिल डाहेलकर यांनी केले.समाजातील उपेक्षित, वंचित आणि ज्येष्ठ नागरिकांना सण-उत्सवांच्या आनंदात सहभागी करून घेणारा हा उपक्रम केवळ दिवाळी साजरी करण्यापुरता मर्यादित नसून, माणुसकी, प्रेम, जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा एक आदर्श उपक्रम ठरत आहे.

No comments