निवेदनाची दखल अंतुर्ली फाटा ते नायगाव मरीमातेपर्यंत रस्त्याच्या झाडे जोडपे तोडण्यास सुरुवात किरण धायले. प्रतिनिधी:- (संपादक :- हेमकांत गायकव...
निवेदनाची दखल अंतुर्ली फाटा ते नायगाव मरीमातेपर्यंत रस्त्याच्या झाडे जोडपे तोडण्यास सुरुवात
किरण धायले. प्रतिनिधी:-
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुक्ताईनगर उपविभागीय अभियंता प्रवीण बेंडकुळे साहेब व शाखा अभियंता बाविस्कर साहेब यांना वेळोवेळी निवेदन देऊन फोनवरून चर्चा करून अंतुरली फाटा ते अंतुरली गाव बेलखेड बेलवाडी मार्गे नायगाव फाट्यापर्यंत रस्त्याची झाडे झुडपे त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विभागाचे प्रदेश सचिव अनिल वाडीले यांनी विनंती केली होती निवेदनावर गावातील बहुतेक नागरिकांच्या सह्या आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत अपघात होऊ नये म्हणून त्वरित रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी साईट पट्ट्या भरण्यात याव्या अशी मागणी सुद्धा केलेली आहे. ती सुद्धा लवकरात लवकर करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
प्रत्यक्ष झाडेझुडपे तोडण्याचे काम अंतुरली फाटा पासून सुरू करण्यात आले आहे. त्याची प्रत्यक्ष पाहणी अनिल वाडीले ,शेख भैय्या शेख करीम, माजी सरपंच कैलास दुट्टे , मोहन बेलदार, योगेश महाजन, यांनी रस्त्यावर/साईट वर जाऊन जेसीबी सुरू असताना सुपरवायझर व ड्रायव्हर त्यांना सूचना करून व्यवस्थित काम करावे अशा सूचना केल्या.

No comments