adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दिवाळीचा आनंद आदिवासी विद्यार्थ्यांसोबत; निर्वाणा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

दिवाळीचा आनंद आदिवासी विद्यार्थ्यांसोबत; निर्वाणा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम प्रतिनिधी. किरण धायले. (संपादक :- हेमकांत गायकवाड) अंतुर्ली ता. ...

दिवाळीचा आनंद आदिवासी विद्यार्थ्यांसोबत; निर्वाणा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम


प्रतिनिधी. किरण धायले.

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

अंतुर्ली ता. मुक्ताईनगर येथे . : सामाजिक बांधिलकी जपत आणि शिक्षणाचा प्रकाश प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करत निर्वाणा फाउंडेशनच्या वतीने आदिवासी वस्तीतील विद्यार्थ्यांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप तसेच शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.

दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण आहे. समाजातील वंचित व गरजू घटकांनाही या सणाचा आनंद घेता यावा, या भावनेतून फाउंडेशनने हा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

केवळ सण साजरे करणे हा उद्देश नसून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आनंद पोहोचविणे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करणे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. निर्वाणा फाउंडेशनच्या या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले.

"समाजातील शेवटच्या घटकातील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे आणि त्यांच्या हातात शिक्षणाचे साहित्य देणे, हीच खरी दिवाळी आणि सामाजिक परिवर्तनाची सुरुवात आहे."

No comments