यावल गोळीबार टेकडीवर फराळाचा वाटप करून गोरगरिबांची केली दिवाळी साजरी यावल प्रतिनिधी:- (संपादक :- हेमकांत गायकवाड) येथे गोळीबार टेकडीवर दिवा...
यावल गोळीबार टेकडीवर फराळाचा वाटप करून गोरगरिबांची केली दिवाळी साजरी
यावल प्रतिनिधी:-
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
येथे गोळीबार टेकडीवर दिवाळी सणानिमित्ताने गोरगरीब लोकांना दिवाळीत गोडधोड अन्न मिळावे या हेतूने येथील सेवानिवृत्त शिक्षक पी एस सोनवणे सर यांच्या संकल्पनेतून गोळीबार टेकडी परिसरात आदिवासी दिन दलित गोरगरीब जनतेला फराळाचा वाटप करण्यात आला त्यात शेवटचे लाडू शंकरपाळे शंभर ते सव्वाशे गोरगरीब जनतेला या ठिकाणी वाटप करण्यात आले त्यात या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर युवराज चौधरी होते या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून एस जे बडगुजर सर (सेवा निवृत्त मुख्याध्यापक साने गुरुजी विद्यालय यावल )माजी नगरसेवक विजय गजरे बिडी पाटील सर पत्रकार अरुण पाटील सुधाकर धनगर विकास आलो नि हे उपस्थित होते या गोरगरीब जनतेसोबत सर्वांनी बसून दिवाळीच्या एक दिवस आधी फराळाचा आस्वाद घेतलाव या गोरगरीब जनतेची दिवाळी गोड केली .या कार्यक्रमामुळे या गोरगरीब जनतेच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला व येथील माता भगिनींनी सोनवणे सरांना प्रेमाचा आशीर्वाद दिला .

No comments