adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पंडित जवाहरलाल नेहरू व भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त चोपड्यात अभिवादन कार्यक्रम संपन्न

  पंडित जवाहरलाल नेहरू व भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त चोपड्यात अभिवादन कार्यक्रम संपन्न चोपडा प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड...

 पंडित जवाहरलाल नेहरू व भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त चोपड्यात अभिवादन कार्यक्रम संपन्न


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


चोपडा : चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) कमिटीच्या वतीने भारतरत्न, भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त तसेच महान आदिवासी क्रांतिकारक व स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मा. भैय्यासाहेब ॲड संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताच्या उभारणीत दिलेले योगदान, लोकशाही मूल्यांवरील त्यांची निष्ठा तसेच बालकांप्रती असलेले प्रेम तसेच भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष, स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान आणि अन्यायाविरुद्ध उभारलेला लढा यांचे स्मरण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमातून महापुरुषांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष मोहन पाटील शहराध्यक्ष अशोक साळुंखे, माजी शहराध्यक्ष के डी चौधरी जिल्हा सचिव आरिफ शेख, जिल्हा सचिव संजीव सोनवणे,माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, नगरसेवक रमाकांत ठाकूर, देविदास साळुंखे, रमाकांत सोनवणे,एम एन शिंदे,माणिक पाटील, प्रकाश चौधरी,सुमित पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments