फैजपूर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के; फैजपुर शहरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले ते सी सी टि फुटेज मध्ये दृश्य इदू पिंजारी फैजपूर (संपादक :...
फैजपूर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के;
फैजपुर शहरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले ते सी सी टि फुटेज मध्ये दृश्य
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
आज फैजपूर परिसरात शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील सुखपुरी, तालुका भागलपूर परिसरात सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या भूकंपाचे सौम्य धक्के फैजपूर परिसरात यावल, सावदा,तसेच परिसरातील काही भागांत जाणवले. काही नागरिकांना घरातील वस्तू व फर्निचर हलल्याची, तर काहींना काही क्षणांसाठी जमीन हादरल्याची जाणीव झाली. अचानक जाणवलेल्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेत संबंधित यंत्रणांकडून माहिती जाणून घेतली. प्रशासनाकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, जिल्ह्यात अद्याप कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखावी, सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेश आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments