निवेदनाची दखल धनतेरस च्या शुभ मुहूर्तावर अंतुर्ली ते धुळे बस सेवा सुरू किरण धायले.प्रतिनिधी. अंतुर्ली शहर (संपादक :- हेमकांत गायकवाड) महाराष...
निवेदनाची दखल धनतेरस च्या शुभ मुहूर्तावर अंतुर्ली ते धुळे बस सेवा सुरू
किरण धायले.प्रतिनिधी. अंतुर्ली शहर
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभाग मुक्ताईनगर आगारातर्फे अंतुरली येथून धुळ्यासाठी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. मुक्ताईनगर आगार व्यवस्थापक निलेश कलाल साहेब यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे व्हीजेएनटी विभागाचे प्रदेश सचिव अनिल वाडीले व त्यांचे सहकाऱ्यांनी अंतुरली ते जळगाव साठी बस सेवा सुरू व्हावी असे निवेदन दिले होते. त्याचा पाठपुरावा करून जळगाव विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे साहेब , जळगाव विभागीय वाहतूक अधिकारी मयूर पाटील साहेब, अभिजीत जैस्वाल, मुक्ताईनगर वाहतूक अधीक्षक अनिल बावस्कर यांना वेळोवेळी भेटून, विनंती करून अंतुर्ली हून बस सेवा सुरू करावी अशी विनंती केली होती त्याची दखल अधिकारी यांनी घेतली व धनतेरस च्या दिवशी अंतुरलीतून धुळे जाण्यासाठी सकाळी 7.30 वाजता इच्छापुर, मुक्ताईनगर, वरणगाव, भुसावळ, जळगाव ,एरंडोल, पारोळा, मार्गे धुळे बस सुरू करण्यात आली. बसचे नारळ फोडून पूजा करण्यात आली. याप्रसंगी ड्रायव्हर एसपी नारखेडे व कंडक्टर राहुल खोसे यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भ्रष्टाचार अत्याचार समितीचे अध्यक्ष शेख भैय्या शेख करीम, माजी सरपंच कैलास दुट्टे, बाळू शामराव पाटील, भागवत गरबड महाजन, शेख मोती शेख हुसेन, माजी प्राचार्य बि.डी. बारी सर, उखर्डू बोरसे, संजय कोळी, प्रभाकर रामू महाजन, अनिल दुट्टे , संदीप ठोंबरे, राजेंद्र देशमुख, , पंकज पाटील, रामभाऊ लक्ष्मण पाटील, शांताराम महाजन, योगेश बारी, सुनील सपकाळ, रघु टोंगळे, अशोक महाजन,प्रगती टेलर, मधुकर तेली, महेंद्र दाणी, अनिल वंजारी, बी.एस.,वानखेडे सर, राजू कोळी, अशोक वंजारी, समाधान महाजन, प्रवासी, गावकरी मंडळी, नागरिक, महिला भगिनी पण उपस्थित होत्या. यावेळी पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
त्याचप्रमाणे मुक्ताईनगर आगारप्रमुख निलेश कलाल साहेब यांनी सांगितले की जेष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना एसटी महामंडळात सवलतीचे तिकीट प्राप्त करण्यासाठी दिनांक 31 डिसेंबर 2026 पर्यंत NCMC कार्ड नोंदणीकरण व वितरण करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. तरी ज्यांचे एनसीएमसी कार्ड बनवायचे राहिलेले असतील त्यांनी त्वरित करून घ्यावे व तुम्ही वंचित राहणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे,या संधीचा फायदा घ्यावा असे सूचित करण्यात आले आहे.

No comments