चोपड्यात ‘एक पणती अजित दादांसाठी’ उपक्रम उत्साहात संपन्न; नागरिकांनी प्रज्वलित केल्या भावपूर्ण पणत्या चोपडा प्रतिनिधी अशोक कोळी (संपादक : हे...
चोपड्यात ‘एक पणती अजित दादांसाठी’ उपक्रम उत्साहात संपन्न; नागरिकांनी प्रज्वलित केल्या भावपूर्ण पणत्या
चोपडा प्रतिनिधी अशोक कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरातील तिरंगा चौक येथील नगरपरिषद उद्यानात ‘एक पणती अजित दादांसाठी’ हा भावपूर्ण उपक्रम बुधवार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.
सुनील भाऊंच्या अश्रू अनावर झाले
या उपक्रमात शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पणत्या प्रज्वलित करून दादांप्रती आपले प्रेम, आदर आणि आपुलकीच्या भावना व्यक्त केल्या. पणत्यांच्या प्रकाशातून एकजुटीचा आणि भावनिक जिव्हाळ्याचा संदेश देण्यात आला. यामुळे नगरपरिषद उद्यान परिसरात भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
या उपक्रमाची संकल्पना सुनील पाटील, वाळकी कर चोपडा यांची होती. त्यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी माजी आमदार कैलास पाटील, चंद्रहास गुजराती, नेमीचंद जैन, घाडवेलकर सुनील जैन, घनश्याम अण्णा पाटील, संदीप भैय्या पाटील, इंदिरा ताई पाटील, घनश्याम अग्रवाल, अनिल वानखेडे, नरेंद्र पाटील, रोहन पाटील, राजू दादा, राजू भाऊ बिटवा, राजाराम पाटील,ऍड धर्मेंद्र सोनार, डॉ.चंद्रकांत बारेला, प्रवीणभाई गुजराती, नंदकिशोर पाटील,कांतिलाल पाटील,भाऊसाहेब पाटील, शशिकांत पाटील, दिनेश बाविस्कर, मोहन पाटील, नईम शेख, जमील कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
‘एक पणती दादांसाठी’ या उपक्रमातून व्यक्त झालेल्या प्रेम, आदर आणि आपुलकीच्या भावनांनी उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला. पणत्यांच्या प्रकाशात एकत्र आलेल्या नागरिकांच्या सहभागामुळे हा उपक्रम संस्मरणीय ठरला.



No comments