adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आमदार नंदकिशोर महाजन यांनी तहसीलदार संजय तायडें समवेत केली जळीत गोडाऊनची पाहणी! खिर्डी खुर्द येथील आगग्रस्त शेतकऱ्याला दिलासा: नुकसानीचा तातडीने पंचनामा करण्याचे तहसीलदारांना निर्देश; शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न

आमदार नंदकिशोर महाजन यांनी तहसीलदार संजय तायडें समवेत केली जळीत गोडाऊनची पाहणी! खिर्डी खुर्द येथील आगग्रस्त शेतकऱ्याला दिलासा:  नुकसानीचा ता...

आमदार नंदकिशोर महाजन यांनी तहसीलदार संजय तायडें समवेत केली जळीत गोडाऊनची पाहणी!

खिर्डी खुर्द येथील आगग्रस्त शेतकऱ्याला दिलासा: 

नुकसानीचा तातडीने पंचनामा करण्याचे तहसीलदारांना निर्देश; शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न 


रावेर प्रतिनिधी : मुबारक तडवी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकरी राजकुमार डिगंबर महाजन यांचे गोडाऊन जळून खाक झाले. या दुर्घटनेत गोडाऊनमधील साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी कुटुंबासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार नंदकिशोर महाजन यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त गोडाऊनची पाहणी केली. तसेच पीडित शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

९ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या आगीच्या दुर्घटनेमुळे राजकुमार महाजन यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आमदार महाजन यांनी घटनास्थळाची पाहणी करत आगीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली.

नुकसानभरपाईसाठी प्रशासनाला तातडीच्या कार्यवाहीचे आदेश

आगीत नुकसान झालेल्या साहित्याचा योग्य आढावा घेऊन पंचनामा तातडीने करण्यात यावा, अशा सूचना आमदार नंदकिशोर महाजन यांनी प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांना दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत मिळण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया विलंब न करता पूर्ण करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

या प्रसंगी सर्कल अधिकारी नेहेते, निलकंठ बढे, विलास पाटील, सोनू पाटील, अतुल पाटील, बेबनभाई, सतीश फेगडे यांच्यासह गावातील नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

आगीच्या दुर्घटनेमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महाजन कुटुंबाला आमदारांच्या प्रत्यक्ष भेटीमुळे दिलासा मिळाला आहे. आता महसूल प्रशासनाकडून पंचनामा पूर्ण होऊन शासनाची आर्थिक मदत किती लवकर मिळते, याकडे नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबासह खिर्डी खुर्द ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

No comments